जागतिक टपाल दिनानिमित्ताने मारतळा जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शाळा सुरू केल्याचे मानले आभार !

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( मिलिंद जाधव ) :

9 ऑक्टोबर जागतिक टपालदिन असून सध्या या आधुनिक संगणकीय युगात पत्रांचे महत्त्व कमी झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे.त्याचे महत्त्व विध्यार्थ्यांना समजावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून उपक्रमशील शिक्षक रवी ढगे जागतिक टपाल दिनानिमित्त मुलांना पोस्ट कार्ड आणून देतात व पत्र लेखन स्पर्धा घेतात मागिल दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या . 


4 ऑक्टोबर पासून ग्रामीण भागातील 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरू करण्याचे शासन आदेश आले असून नियमितपणे शाळा सुरू झाली.त्यांचाच एक भाग म्हणून शाळेतील वर्ग 5 वीच्या मुलांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री श्री अजित पवार ,शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड आदींना आभाराचे पत्र लिहिले. तसेच गावातील पोस्ट मास्टर म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचारी श्रीमती हिना शेख यांचा सत्कार करण्यात आला .


नंतर यात मुलांनी गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शासनाच्या वतीने शाळा बंद, पण शिक्षण सुरू  या अंतर्गत मोबाईल, दीक्षा अप, टिली-मिली  अभ्यासमाला 2.0 ,शिकू आनंदे,सेतू अभ्यास, आदींच्या माध्यमातून मुले शिक्षण घेत आहेत तर काही मुलांकडे मोबाईल अथवा  मोबाईलमुळे व टीव्ही नसल्याने त्यांच्या शिक्षणात आडथळा निर्माण होत होता तसेच काही मोबाईल वर अभ्यास केल्याने मुलांचे डोळे, डोक दुखत आहे, जास्त बैठे काम करून त्यांना आता कंटाळा आला होता, घरी सुध्दा करमत नव्हते, त्यामुळे शासनाने आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री या सर्वांचे एक पत्र लिहून मुलांनी पोस्ट कार्डच्या माध्यमातून अनोख्या पध्दतीने आभार मानले आहे.


 पोस्ट कार्ड संबंधित पोस्ट मास्टर ला दिली, सदरील उपक्रम उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख टी पी पाटील , शाळेचे मु.अ. आनंद दरेगावे,उपक्रम शील शिक्षक रवी ढगे, विषय शिक्षक व्यंकट मुगावे, बालाजी प्यारलावार ,माधुरी मलदोडे,जयश्री बारोळे, होळकर , रमेश हणमंते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)