नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाकी धुळदेव केंद्र देवठाणा तालुका भोकर शाळेत नवोदय विद्यालय मध्ये पात्र झालेल्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती पाकी धुळदेव चे अध्यक्ष श्री विठ्ठलराव जाधव तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवठाणा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय लक्ष्मणराव सुरकार सर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरबन चे मुख्याध्यापक श्री कृष्ण वट्टमवार सर तसेच आदर्श शिक्षक गोपाल मुंडकर सर तसेच जिल्हा परिषद हायस्कूल किनी चे आदर्श शिक्षक गजानन मुळे सर, तंटामुक्ती अध्यक्ष तथा शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री सिद्धाराम नाईक राठोड, ग्रामपंचायत पाकी धुळदेव चे सदस्य नवीन रेडी तसेच रामु राठोड ,बालाजी येंगेवाड शाळेचे मुख्याध्यापक पी.एम .देशमाने गावातील पालक प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी तसेच सत्कारमूर्ती पालक संतोष वाघमोडे, विठ्ठलराव जाधव ,गजानन मुळे सत्कारमूर्ती विद्यार्थी आर्यन संतोष वाघमोडे ,विद्यार्थी महेश विठ्ठल जाधव ,विद्यार्थिनी अक्षरा गजानन मुळे या सर्वाचा गावाच्या च्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला.
गावातील पालक सुद्धा या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल तसेच त्यांनी मिळवलेले यश पाहून आपला पाल्य असाच नवोदय पात्र व्हावा यासाठी भोकर तालुक्यातील नवोदय पात्र विद्यार्थ्यांच्या यश पाहून अशाप्रकारे आपल्याही पाल्यांना शिक्षण देण्याची ओढ निर्माण व्हावी. नवोदय पात्र विद्यार्थ्यांची पेरणा मिळावी यासाठी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगतामध्ये गजानन मुळे सरांनी माझी मुलगी कशाप्रकारे नवोदय ला लागली याची माहिती सांगितली. तसेच थेरबन शाळेचे मुख्याध्यापक वट्टमवार सरांनी आमच्या शाळेतील दोन नवोदय पात्र विद्यार्थी कसे बनले याबद्दल सविस्तर मार्गदर्शन पालकांना केले. तसेच देवठाणा केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी सुद्धा ग्रामीण भागातील शिक्षण कशाप्रकारे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणत आहे.आज विद्यार्थी नवोदय पात्र होत आहेत याची माहिती सांगितली तसेच पाकी धुळदेव शाळासुद्धा आदर्श आणि उपक्रमशील आहे .असे मनोगतातून श्री सुरकार सरांनी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुराव माडगे यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद देशमाने यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री देशमाने प्रमोद ,शाळेचे सहशिक्षक बाबुराव माडगे शालेय पोषण आहार चे कर्मचारी अन्नपूर्णा बालाजी जंगमवाडी, देविदास येंगेवाड बालाजी जंगमवाड आदिनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .