शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन !

शालेयवृत्त सेवा
0


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचा पुढाकार


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतिने नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.


मा.मीनल करनवाल मॅडम(IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड आणि राजकुमार मुक्कावार उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना प्रत्यक्ष भेटून जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्न सोडविणे बाबद निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात केंद्रप्रमुख, पदोन्नत मुख्याध्यापक,शिक्षण विस्तार अधिकारी, विषय शिक्षक यांचे पदे समोपदेशन पध्दतीने तात्काळ भरण्यात यावेत. नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणावर शिक्षक संघाचा बहिष्कार त्याबरोबरच  शिक्षकांना शैक्षणिक कामे सोडुन तसेच विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होणार नाही यासाठी अन्य कोणतेही अशैक्षणिक कामे शिक्षकांवर बंधनकारक करण्यात येऊ नयेत. 


विषय शिक्षकांना पदविधर वेतनश्रेणी बहाल करण्यात यावी.  निवडश्रेणी अद्यापपर्यंत निकाली निघाली नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षक निवडश्रेणीपासुन वंचित आहेत ती यादी तातडीने निकाली काढण्यात यावी.  शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेस करण्यास यावेत. नांदेड जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांना 05 सप्टेंबर रोजी गुरु गौरव पुरस्कार वितरीत करण्यात यावा.  GPF स्लिप जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यासह GPF स्लिप वितरीत करण्यात यावी. शिक्षकांच्या कोणत्याही फाईल दाखल केलेल्या इ ट्रॅकिंग  मोडवर करण्यात यावे. केंद्रप्रमुखांचा पदभार देतांना पदवीधर शिक्षक/विषय शिक्षक यांच्यापैकी बी.एड. असलेल्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदभार देण्यात यावा.


वरिल विषयांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन, सर्व शिक्षकांचे विषय सोडविण्यात यावेत ही संघटनात्मक विनंती करण्यात आली. सदरील निवेदन ची दखल माननीय राजकुमार मुक्कावार साहेब  उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेऊन सदरील विषयात मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या सोमवारच्या बैठकीत ठेवण्यात येईल असे आश्वासन दिले. सदर निवेदनावर राज्य संघटक दत्तरामपाटील भोसले, जिल्हा सचिव बाबुराव माडगे, सरचिटणीस भगवान गजभारे, उपनेते श्रीराम पाटील आधीच्या साक्षरतेचे निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनाचे अभिनंदन मुख्य सल्लागार जीवनराव पाटील वडजे , राज्य उपाध्यक्ष नरसिंग सोनटक्के, विभागीय सरचिटणीस पाराजी पोले, शिक्षक नेते संजय पाटील आंबुरे, जिल्हाध्यक्ष बाबुराव फसमले यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)