राज्यातील एकमेव शिक्षिकेचा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार सन्मान !
पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
यावर्षीचा ' नॅशनल अवार्ड टीचर ' राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहिर झाला असून राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना 5 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळणार आहे.
दरवर्षी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या वतीने देशातील शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यंदा महाराष्ट्रातून सहा नामांकने केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली होती त्यातून एकमेव पुरस्कार मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना जाहीर झाला असल्याचे पत्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहसचिव प्राची पांडे यांनी पाठवले आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देशातील शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने 5 सप्टेंबर रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. मृणाल गांजाळे या जिल्हा परिषद समीक्षा शाळा गाव महाळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी राज्य शिक्षक पुरस्कार आणि आयसीटी अवॉर्डही मिळालेला आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषद पुणे आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची संघटनांनी अभिनंदन केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .