ठाणे ( शालेय वृत्तसेवा ) :
शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी 'कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आधारित हा पुरस्कार देण्यात येणार आहे. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी, महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
उपक्रम अहवाल लेखनाबाबत अधिक सविस्तर माहितीसाठी आणि नमुना उपक्रमांसाठी महिलांनी www.ShikshakDhyey.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समाविष्ट असावेत.
१) उपक्रमाचे शीर्षक
२) सामाजिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती अथवा
३) शैक्षणिक उपक्रम फोटोसह सविस्तर माहिती
४) मिळालेले विविध शिफारसपत्रे आणि पुरस्कारांची नावे
महिलांनी आपल्या उपक्रमाचा अहवाल/प्रस्ताव बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत वर्ड मध्ये टाईप करुन नंतर त्याची पिडीएफ तयार करून ९६२३२३७१३५ या व्हाटसअॅप नंबरवर पाठवावी. उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२६ आहे.
विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
एका प्रस्तावासाठी नोंदणी शुल्क पाचशे पन्नास रुपये भरणे बंधनकारक आहे.
नोंदणी शुल्क भरण्यासाठी फोन पे/गुगल पे नंबर ९६२३२३७१३५ हा आहे.
याच मोबाईल नंबरवर शुल्क भरल्याचा स्क्रीन शॉट आणि उपक्रमाचा प्रस्ताव पाठवावा.
या स्पर्धेसाठी सर्व क्षेत्रातील महिला सामाजिक कार्यकर्ती महिला, डॉक्टर, वकील, शिक्षिका, राजकारणातील महिला, गृहिणी, सरकारी नोकरी किंवा खासगी नोकरी करणारी महिला सहभागी होऊ शकतात.
राज्यातील उपक्रमशील महिलांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन 'शिक्षक ध्येय'चे मधुकर घायदार, प्रभाकर कोळसे; मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या सावंत; यशिता गार्डन नर्सरीचे अथर्व गडवार; डी. जी. पाटील, विजय अहिरे, मेघा पाटील, नंदुरबार; कविता चौधरी, भाग्यश्री पवार, श्रद्धा पवार जळगाव; मंजू वानखडे, अर्चना भरकाडे, अंजली वारकरी, अमरावती; अशरफ आंजर्लेकर, विद्या देवळेकर, रत्नागिरी; कैलास बडगुजर, ठाणे; राजेंद्र लोखंडे, नाशिक; कांबळे एस. जी. पाटोदेकर, महादेव खळूरे, लातूर; खुशाल डोंगरवार, भंडारा; वसुधा नाईक, अश्विनी दीक्षित, पुणे; सुरेखा उजगरे, प्रेमजीत गतीगंते, संगीता पवार, मुंबई; सविता डाखोरे, सोलापूर; धन्यकुमार तारळकर, सातारा; संजय पवार, रायगड; दिवाकर मादेशी, गडचिरोली; सी एच बिसेन, गोंदिया यांनी केले आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .