बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड / बारड ( शालेय वृत्तसेवा ) : 

उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनीयर, संशोधक, शिक्षक व अन्य क्षेत्रात मोठे व्हा; पण त्याहून मोठे माणूस व्हा, असे प्रतिपादन लोकविज्ञान चळवळीतील कार्यकर्ते डॉ. हेमंत कार्ले यांनी केले. ते जिल्हा परिषद हायस्कूल, बारड येथील प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभात बोलत होते.

डॉ. कार्ले पुढे म्हणाले, "नियमित अभ्यास, शिस्त आणि कष्ट घेण्याची जिद्द यावरच विद्यार्थी प्रगतीची अत्युच्च शिखरे गाठू शकतात." यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रेरणादायी उदाहरणांसह संबोधित केले. हा कार्यक्रम जवळपास दोन तास चालला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका शुभांगी तळणकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलासजी पुलकंदवार, दिगंबर कदम, मेघनाताई सुकापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी कुमारी वैष्णवी धुडकेवार, प्रेरणा सुकापुरे, रागिनी आठवले, श्रद्धा देशमुख, ऐश्वर्या माने यांच्यासह अनेक विद्यार्थी प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. दिगंबर कदम यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. अध्यक्षीय समारोपानंतर इयत्ता नववीच्या वतीने सर्वांना भोजन देण्यात आले.


कार्यक्रमाला बाबुराव कुलूपवाड, बालाजी गीते, तानाजी ताटे, सुनील चमकुरे, वाघमारे बारहळीकर, अजय रुद्रकंटवार, बालाजी तोटेवाड, मुकुंद अलासपुरे, सौ. सुनिता मेटकर, वैशाली भालके, बोरीकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)