नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :
आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सलाम मुंबई फाऊंडेशन,एव्हरेस्ट फाऊंडेशन व नाशिक जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभाग यांनी नाशिक जिल्हा बालपरिषद आयोजित केली होती. या ऑनलाईन बालपरिषदेसाठी आमच्या एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर जि.नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक
श्री. रवींद्र परदेशी (उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.प नाशिक), श्री. गणेश परळीकर (सहाय्य्क आयुक्त, एफ. डी . ए . नाशिक) , पुष्पाताई पाटील (सहाय्य्क संचालक, शिक्षण विभाग, नाशिक विभाग) , श्री. राजीव म्हसकर (शिक्षणाधिकारी, नाशिक),
श्री. विजेंद्र बाबू (एव्हरेस्ट इंडस्ट्रीज लखमापूर कपंनी प्रमुख) , श्री. धर्मराज बांगर (पोलीस इन्स्पेकटर, नाशिक)
डॉ. शिल्पा बांगर (जिल्हा एनटीसीपी सल्लागार) , श्री. संदीप मुगल (मुख्य वार्ताहर, सकाळ), श्री. मनीषकुमार सिंग (सीएसआर मॅनेजर, एव्हरेस्ट ) यानी परिषदेत मार्गदर्शक केले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .