मुंबई ( उदय नरे ) :
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सानेगुरुजीचे शिकवण देणारी श्यामची आई आज ही अजरामर आहे. शाळेतील शिक्षिका या श्यामच्या आईप्रमाणेच विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणेच शिक्षण देत आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे ध्येय आहे. शिक्षण क्षत्रात कार्य करत असलेल्या महिला शिष्टमंडळानी आज शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व साने गुरूजींच्या विचारांची अमुल्य भेट पुस्तक रुपाने दिली. याप्रसंगी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शिक्षिका श्रीमती उमा ढेरे, वरिष्ठ शिक्षिका मिनाक्षी रेडकर उपस्थीत होते.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .