अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ पालघर आयोजित क्रिकेट स्पर्धा संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 




पालघर ( सचिन कुसनाळे ) :

 दिनांक 14/02/2021 रोजी निंबापूर (डहाणू तालुका) या  ठिकाणी अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ पालघर आयोजित क्रिकेट स्पर्धा  उत्साहात पार पडल्या.


उद्धाटन ला पालघर जिल्हा अर्थ व बांधकाम सभापती श्री काशीनाथ चौधरी साहेब यांच्या हस्ते झाले.  एकूण 16 पालघर जिल्यातील  संघाने सहभाग घेतला होता. त्यात प्रथम क्रमांक   टीचर्स 11 वाडा (वाडा तालुका) 12.000 रुपये,   द्वितीय क्रमांक टीचर्स ग्रुप विरार    6,000 रुपये (वसई तालुका) , तृतीय क्रमांक 3,000 रुपये  जव्हार रायडर (जव्हार तालुका) , चतुर्थक्रमांक 3,000 शारीरिक शिक्षण संघ डहाणू (डहाणू तालुका) ह्या संघांना कॅश बक्षीस व प्रमापत्र देण्यात आले. तसेच इतर संघांना सहभाग प्रमापत्र देऊन गौरवण्यात आले.


यावेळी अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ पालघर कार्यकारी सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)