महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीआई फुले यांच्यावर आजवर निघालेल्या ग्रंथांपैकी सर्वात मोठा ग्रंथ 'क्रांतिरत्न' दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी महात्मा फुले यांच्या जन्मदिनी प्रकाशित होत आहे. या ग्रंथामुळे महात्मा फुले- सावित्रीआई फुले यांचे जीवन, विचार, कार्य आदींचे विविध पैलू उलगडण्यास मदत होणार आहे. महात्मा फुले-सावित्रीआई फुले यांच्या जीवन-कार्यावर संशोधन करणार्या संशोधकांना या ग्रंथामुळे फार मोठी मदत होणार आहे. तसेच सर्वसामान्य वाचकांना देखील या ग्रंथातून बहुमोल माहिती प्राप्त होणार आहे. ग्रंथात 1021 पाने असून महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांच्यावरील हा आजवरचा सर्वात मोठा ग्रंथ आहे.
प्रेरणा राजेश खवले या ग्रंथाच्या संकल्पक असून प्रा. डॉ. पूष्पा तायडे या ग्रंथाच्या मुख्य संपादक आहेत. प्रा. डॉ. सतीश पावडे, प्रा. डॉ. विजय सूर्यवंशी, सतीश जामोदकर, प्रा. डॉ.चंद्रकांत सरदार हे या ग्रंथाचे संपादक आहेत. डॉ. विश्वनाथ शेगावकर (IAS) ऍड. अशोक गेडाम, निवृत्त उपजिल्हाधिकारी हे या ग्रंथाचे मार्गदर्शक आहेत. उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे, तहसीलदार राहुल तायडे, तहसीलदार विजय वाघमारे, तहसीलदार प्रताप वाघमारे, जि.ख.अ. अतुल दोड यांच्या निर्मिती मंडळाने अतिशय परिश्रम घेऊन या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे.
या ग्रंथांचे विविध मान्यवरांनी कौतुक केलेले आहे. केंद्रीय मंत्री नामदार श्री. नितीन गडकरी, मंत्री मा. ना.संजय धोत्रे, मंत्री मा. ना छगन भुजबळ, मंत्री मा. ना. अमित देशमुख, मंत्री मा. ना. बच्चुभाऊ कडू, खासदार संभाजी शाहू छत्रपती, संपादक श्री. विजय दर्डा, डॉ. प्रकाश आमटे, डॉ.मंदाताई आमटे, कुलपती डॉ. रजनीश कुमार शुक्ल, कुलगुरू सुभाष आर चौधरी, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, मा. कुलगुरू डॉ. एस.एस. पठाण आदी मान्यवरांनी या ग्रंथाचे कौतुक केले असून त्यांच्या शुभेच्छा संदेशांचा या ग्रंथात समावेश करण्यात आलेला आहे. सध्या हा ग्रंथ ई- बुक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येत असून लवकरच ग्रंथांची मुद्रित प्रत प्रकाशित होणार आहे. श्री. सचिन राळे यांच्या परिश्रमातून हा ग्रंथ लवकरच गुगल प्ले स्टोअर वर मोबाईल अँप च्या स्वरूपात देखील उपलब्ध होणार आहे. सर्व माध्यमांचा वापर करून अधिकाधिक वाचकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्याचा निर्मिती मंडळाचा प्रयत्न राहणार आहे.
ग्रॅव्हिटी प्रकाशनतर्फे वर्षा राजू चिमणकर यांनी हा महाग्रंथ प्रकाशित केलेला आहे. वाचक अभ्यासक व संशोधक संदर्भग्रंथ म्हणून या ग्रंथाचे निश्चितच स्वागत करतील, असा विश्वास आहे..


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .