राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे (बीड), कुंदा जयवंत बच्छाव (नाशिक), वैभव वसंतराव कुलकर्णी (लातूर) आणि शिवप्रसाद अरविंद टिंगरे (सातारा) या चार शिक्षकांचा समावेश आहे.
शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला जातो. नाविन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर १५ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकन मागविण्यात आले होते.
राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार - २०२६
NationalTeachersAwards - 2026


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .