राष्ट्रीय- राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. हेमंत कार्ले यांची तर सल्लागारपदी डॉ. शेख एम.एच.डब्ल्यू. यांची निवड

शालेयवृत्त सेवा
0

 



राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनिल आलुरकर यांची उपाध्यक्षपदी निवड !


नांदेड ( प्रतिनिधी ) :

राष्ट्रीय - राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य  शाखा नांदेडची कार्यकारणी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी नुकतीच जाहीर केली. जिल्हाध्यक्षपदी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. हेमंत कार्ले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.



राष्ट्रीय -राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. यावेळी नांदेड जिल्हा शाखेचे कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील अलुरकर यांची उपाध्यक्षपदी, जिल्हा सरचिटणीस म्हणून गणेश जाधव यांची तर कार्याध्यक्ष म्हणून रमेश मुनेश्वर यांची निवड करण्यात आली. डॉ. शेख एम. एच. डब्ल्यू. हे सल्लागार म्हणून काम पाहतील. उर्वरित कार्यकारणी दुसऱ्या बैठकीत करण्याची जबाबदारी राज्याध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्षावर सोपविली.


यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी, देविदास तारू, सिराज अनवर, विजय गादेवार, गंगाधर वाघमारे, रामा उईके, आसाराम चव्हाण, शालिनी सेलूकर, श्रीमती मीना आदी राष्ट्रीय - राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षीका उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी या नोंदणीकृत संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यानी केले आहे.


राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना विविध शासकीय समितीवर प्रतिनिधीत्व मिळावे. जिल्हा परिषद शिक्षण समितीवर निवड करण्यात यावी. पूर्ववत दोन वेतनवाढी देण्यात यावेत. रेल्वे-बस प्रवासासाठी सवलत मिळावी. या आणि अन्य मागण्यासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न करण्यात येईल.

- जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत कार्ले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)