वयानुरूप समकक्ष वर्गात दाखल करणार्या मुलांच्या प्रशिक्षणास उस्फूर्त प्रतिसाद..
नांदेड ( नागेश क्यातमवार ) :
दि. 3 डिसेंबर 2019 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणे यांच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एक अभ्यासक्रम विकसित केला असून त्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण दि. 3 ते 4 डिसेंबर ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
यासाठी प्रेरणा म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे या आहेत. मुख्य मार्गदर्शन म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉ. रवींद्र आंबेकर व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सौ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील प्रशिक्षण संपन्न झाले. यासाठी पहिल्यांदाच प्रशिक्षण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून यूट्यूब लिंक तयार करण्यात आली होती. या युट्यूबवर जिल्ह्यातील नव्हे राज्यभरातून 7200 विवर्स यांनी पाहिल्याची नोंद झाली आहे.
सदरील प्रशिक्षणाचे प्रमुख म्हणून अधिव्याख्याता अभय परिहार, बालरक्षक समन्वयक डॉ. दादाराव शिरसाट हे होते, तर या प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून नागेश क्यातमवार, रवी ढगे, उषा नळगिरे, कविता जाधव, रामदास कस्तुरे, प्रल्हाद ढाकणे, विकास ढवळे तर या प्रशिक्षणासाठी तंत्र सहाय्य म्हणून जगदीश थडवे, अतुल कुलकर्णी यांनी काम पाहिले.

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .