स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात ७५ शिक्षक कविंनी गाजविले माहूरगडावर कविसंमेलन !

शालेयवृत्त सेवा
0

 


                   

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) : 

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळ महाराष्ट्र मराठवाडा विभागाच्या वतीने माहूर येथील आनंद दत्त धाम आश्रमात नुकतेच एकदिवशीय " शिक्षक साहित्य संमेलन " संपन्न झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष धनंजय गुडसूरकर, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, राज्याध्यक्ष नटराज मोरे, स्वागताध्यक्ष गटशिक्षणाधिकारी रविंद्र जाधव, निमंत्रक तथा राज्य पुरस्कृत शिक्षक रमेश मुनेश्वर, मराठवाडा विभागीय सचिव शेषराव पाटील आदी उपस्थित होते.

        शिक्षक साहित्य संमेलनाचे चौथे सत्र शिक्षक कवींच्या विविधरंगी आणि विविधांगी बहारदार काव्य रचनांनी समृद्ध होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकूण ७५ कवींनी यात सहभाग नोंदवला होता. कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी विरभद्र मिरेवाड होते. सुत्रसंचालन मिलिंद कंधारे व फल्गुनी ढवळे ह्यांनी केले तर आभार सागर चेक्के यांनी मानले.

          काव्यसंमेलनाची सुरवात कवयित्री ज्योती रावते यांच्या 'अंधाराचे दान' या कवीतेने झाली. तर परमेश्वर कुसुमवाड यांनी 'महाराष्ट्राचा तरुण मी' या काव्याने लक्ष वेधले. प्रल्हाद तेलंग यांच्या 'थोडं इकायचं बी घ्या शिकून' या कवीतेने रंग भरला. तर माहूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र जाधव यांनी अस्सल वऱ्हाडी भाषेत 'दगा' या विडंबनपर काव्याने खऱ्याअर्थाने काव्यसंमेलन बोलकं केलं. 

              बाबुराव माडगे यांची 'माय' ही कविता तर राजेंद्र चारोडे यांची 'बाप' ही कविता मार्मिक व मनात घर करून गेली. कवीयत्री शितल गौरखेडे यांची 'माय शोधते आहे' ही कविता डोळे पाणावून गेली. तर गझलकार रुपेश मुनेश्वर यांच्या 'वेदना' या गझल गायणाने अक्षरशः अंगावर शहारे आणले. कवी प्रा.विनोद कांबळे यांनी 'झुकेगा नही साला' या कवीतेने उपस्थितांना सुखावले तर श्याम राठोड यांची विनोदी कविता 'सजनी स्वप्नातली' या कवीतेने सर्वांना खळखळून हसवले. कवी सागर चेक्के यांची 'तृतीयपंथी' ही कविता अंतर्मुख करून गेली तर रामस्वरुप मडावी यांची 'डोंबारी' ही कविता वास्तवाचे भान शिकवून गेली.

          यावेळी कवी रवींद्र ढगे यांनी 'जग जवळ आले' ही तर कवियत्री राणी नेम्माणीवार यांनी 'भोगवटा विहीरीचा' हे काव्य उत्तमरित्या सादर केले.दिगांबर जगताप यांनी 'माझी दिल्ली वारी' तर विजय धोबे यांनी 'एल्गार मनाचा' हे विद्रोही काव्य सादर केले.तसेच कवी विजय वाठोरे यांनी 'समजत नाही' हे अंतर्मन जागवणारे तर कवी शेषराव पाटील यांनी 'माझी अडाणी आई' हे आईचे महात्म्य सांगणारे काव्य सादर केले. कवी रमेश मुनेश्वर यांनी 'मह्या गावाचं मोठेपण' या कवीतेने उपस्थितांची मने जिंकली तर कवी मिलिंद कंधारे यांनी 'विपरीत' या काव्यातून आजच्या समाजव्यवस्थेवर परखड भाष्य केले.प्रसिद्ध गझलकार चंद्रकांत कदम यांनी आपल्या 'विषय संपला' या गझलेतून रसिकांच्या मनाचा ठाव घेत आपल्या मधुर आवाजाने भुरळ घातली तर कवियत्री अनिता दाणे यांच्या स्वयंसिद्धा या कवितेने संपूर्ण स्त्रीशक्तीचा गौरव केला.कवियत्री दिपाली कुलकर्णी यांच्या 'सावित्री' या कवितेने रसिक मनाचा ठाव घेतला तर रोहिणी पांडे यांची गझल म्हणजे लेखन शास्त्राचं उत्तम उदाहरण होतं जी तितकीच ताकदीने सादर झाली तसेच कवियत्री अर्चना गरुड यांच्या 'मराठी माऊली' या काव्याने कविसंमेलनात बहर आला.

              त्याचबरोबर राजेंद्र माळी, रमेश हणमंते, प्राजक्ता लांडे, विजया तारु,गोतम सावंत,भारद्वाज सरपे, कल्याण राऊत,प्रमोद पिल्लेवार,  दिगंबर,व्यंकट आनेराये,दिगंबर कानोळे,बालाजी तुमवाड,भगवान जोगदंड,सोनबा दवणे,धनंजय गिऱ्हे,तुळशीराम तुरे,शैलजा बोटलावार,दिपाली हिंगमीरे,वंदना दवणे,मनोज सोनकांबळे,कल्पना मिलंगापूर,गजानन भारती,भुमय्या इंदूरवार,सावित्री बड्डेवार,राजू भगत, प्रणीता घाटे,उत्तम पवार,मुनेश्वर थोरात,माधुरी मुनेश्वर, वंदना तामगाडगे,नंदा नगारे,सीमा नरवाडे,महानंदा चिभडे,सुरेखा तामगाडगे,योगीता कुलकर्णी,रजनी कुलकर्णी,ज्योती देशमुख,सुनंदा बोक्षे,ममता कांबळे, पंडित बेरळीकर,पांडुरंग कोकुलवार, मुकूंदा अभंगे,अंजली मुनेश्वर,विठ्ठल कुरमेलकर,उत्तम तालंगकर,बळवंत वांगे आदिंनी सहभाग घेऊन आपले एका पेक्षा एक काव्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)