समुपदेशनाद्वारे उद्यापासून होणार सर्वसाधारण बदल्या..

शालेयवृत्त सेवा
0

 

नऊ मे पर्यंत प्रक्रिया होईल पूर्ण !


बुधवारी होणार शिक्षण विभागातील बदली प्रक्रिया सुरु..




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषदेतील गट क (वर्ग 3) व गट ड ( वर्ग 4 ) च्या कर्मचाऱ्यांच्या वर्ष 2025 मधील सर्वसाधारण बदल्या मंगळवारपासून सुरू होणार आहेत. या बदल्या जिल्हास्तरावर पारदर्शक व समुपदेशन प्रक्रियेद्वारे होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या 15 मे 2024 च्या शासन निर्णयानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेतील कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेमुळे दिलासा मिळाला आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याने अमिषाला बळी पडू नये असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले आहे.


समुपदेशन सहा ते नऊ मे दरम्यान जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. प्रत्येक विभागासाठी ठराविक वेळ निश्चित केले आहे बदल्या केवळ पात्र कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्ज व वास्तव्य जेष्ठानुसार करण्यात येणार आहे. 


असे होतील बदल्या :


मंगळवार तारीख 6 मे :

10 ते 12 वेळेपर्यंत वित्त विभाग, 

12 ते 01 जलसंधारण विभाग 

12 ते 1 या वेळेत सामान्य प्रशासन विभागातील बदली प्रक्रिया संपेपर्यंत पार पडतील 

बुधवार तारीख 7 मे :

10 ते  11 कृषी विभाग  

11 ते 1 पशुसंवर्धन विभाग 

तर प्राथमिक शिक्षक वगळून शिक्षण विभागातील बदली प्रक्रिया दुपारी 01 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत ..


गुरुवार तारीख 8 मे :

10 ते 12 महिला व बालकल्याण विभाग 

तर आरोग्य विभागातील बदल्या दुपारी 01 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत.. 


शुक्रवार तारीख 9 मे :

10 ते 12 बांधकाम विभाग 

12 ते 01ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

तर ग्रामपंचायत विभागाच्या बदल्या दुपारी एक ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत..

 

दिव्यांग कर्मचारी तसेच वैद्यकीय कारणावरून बदलीतून सूट मागणी केलेल्या व तसेच बदलीमध्ये प्राधान्य मागणी केलेल्या कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय कागदपत्रे तपासण्यासाठी संपूर्ण बदली प्रक्रिया आरोग्य विभागाचे पथक नियुक्त केले आहे तसेच पूर्ण बदली प्रक्रियेच्या वेळेस आरोग्य विभागाचे पथक उपस्थित राहणार आहे.


बदली प्रक्रियेचे होणार छायाचित्रीकरण :

जिल्हा परिषद परिसरात सीसीटीव्ही च्या माध्यमातून सर्व हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. बदली प्रक्रिया दरम्यान व्हिडिओ शूटिंग केली जाणार आहे. कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी दिला. कर्मचाऱ्यांनी कायदेशीर व पारदर्शक व्यवस्थेवर विश्वास ठेवावा व कोणतेही अफवावर विश्वास ठेवू नये असे त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)