महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आयुक्तांना देणार दससूत्री मागण्यांचे निवेदन
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व जि. प. शाळांचे वर्ग खोल्याचे संरचनात्मक लेखापरीक्षण करणे या प्रमुख मागणीसोबत नांदेड जिल्ह्यातील केंद्रप्रमुख पदे तात्काळ भरणे, सातव्या वेतन आयोगाचे हप्ते जमा करण्यासाठी अनिमियतता झालेबाबतची चौकशी करणे, शिक्षकांचे थकीत वेतन, वैद्यकीय बिल सहा सहा महिन्यापासून प्रलंबित असणे, शिक्षकांची अशैक्षणिक कामे काढून घेणे, पदोन्नतमुख्याध्यापकांची पदे भरणे, २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी मिळणे, शालेय विद्यार्थ्यांचे स्काउटगाइड चे गणवेश व बुट आणि साॕक्स यासाठी निर्धारित केलेल्या रकमेत वाढ करणे, विषय शिक्षकांचे रिक्तपदे भरणे व वेतनश्रेणी देणे, शालेय माहितीचे टप्पे कालबद्ध पद्धतीने मागविणे अशा अत्यंत महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने देण्यात येणार आहे.
जिल्हा शाखा शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना जिल्हा परिषदांच्या शाळा आणि शिक्षकांशी संबधित सविस्तर असे दससूत्री मागण्यांचे निवेदन दिले जाणार असून शिक्षक सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष संतोष आंबुलगेकर, सचिव रवी बंडेवार, कोषाध्यक्ष गंगाधर कदम, कार्याध्यक्ष मनोहर बंडेवार तसेच पदाधिकारी गंगाधर ढवळे, शेख मुस्तफा, शिवाजी पाटील, बळीराम शिंदे, संजय मोरे, प्रकाश कांबळे, शोभा गिरी, बालाजी भांगे, बालाजी लोहगावकर, संतोष घटकार आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच इतर पदाधिकारी यांनीही मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .