शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे साहेबांच्या दूरदृष्टीने २४३० शिक्षक होणार अधिकारी!

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक क्रांती! ना. दादाभाऊ भुसे साहेबांच्या निर्णयाने प्रशासनाला मिळणार 'रॉकेट स्पीड'


        गेल्या 12 वर्षापासून प्रलंबित असलेला आणि राज्यातील हजारो शिक्षकांचे स्वप्न असलेला 'विभागीय केंद्रप्रमुख परीक्षा' दिनांक 3/4 फेब्रुवारी रोजी घेऊन 13 मार्च रोजी निकाल जाहीर झाला .राज्याचे शिक्षण मंत्री ना. श्री. दादासाहेब भुसे साहेब यांच्या सातत्यपूर्ण  पाठपुराव्यामुळे आणि दूरदृष्टीमुळे ही ऐतिहासिक क्रांती झाली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख परीक्षा कोअर कमिटी (नाशिक टीम) च्या वतीने साहेबांचा विशेष सत्कार करण्यात आला.


या निर्णयामुळे प्रशासनात काय बदल होणार?

        २४३० उच्चशिक्षित केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीमुळे शिक्षण विभागाच्या कामकाजात कमालीची गतिमानता आणि अचूकता येईल. या नवनियुक्त अधिकाऱ्यांमुळे शाळांचे पर्यवेक्षण अधिक सक्षम होईल, ज्याचा थेट फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला होईल. निकाल जाहीर होताच अवघ्या एका महिन्यात नियुक्ती देण्याचे आश्वासन भुसे साहेब यांनी दिले.


 "दादा भुसे साहेबांनी शिक्षकांच्या भावना समजून घेतल्या आणि हा प्रश्न तडीस नेला. त्यांच्यामुळेच आज २४३० शिक्षकांना अधिकारी होण्याची संधी मिळत आहे. हे यश महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेणारे ठरेल."

 — राजेंद्र खैरनार ( केंद्रप्रमुख परीक्षा कोअर टीम,महाराष्ट्र राज्य)

       

          शासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे संपूर्ण राज्यभरातील शिक्षक वर्गातून आनंदाचा वर्षाव होत आहे. शिक्षण क्षेत्रातील या नव्या पर्वाचे शिल्पकार दादा भुसे साहेबांचे मनःपूर्वक आभार! साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सकारात्मक काम केल्याबद्दल आम्ही शिक्षण प्रशासकीय विभागाचे  ऋणी आहोत.


           शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य: धोरणात्मक निर्णय घेऊन शिक्षकांना न्याय दिल्याबद्दल आणि शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे: भरती प्रक्रियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता जपल्याबद्दल मा. शिक्षण आयुक्तांचे विशेष आभार .  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे: अत्यंत अल्प कालावधीत परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)