∆ सेवानिवृत्त होत असलेल्या नटराज मोरे सरांचा केला सत्कार !
कल्याण ( शालेय वृत्तसेवा ) :
येथील कल्याण ग्रामीणचे माननीय आमदार श्री राजेशजी मोरे यांनी जिल्हा परिषद शाळा गोळवली येथे मतदान नोंदणी कक्षास भेट दिली असताना शाळेलाही भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारे अनेक व्यक्ती मोठ्या पदावर गेलेल्या आहेत. या शाळेमध्ये ज्ञान आणि संस्कार घडविले जातात. यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा टिकवण्याची जबाबदारी हे गावकऱ्यांची आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझे व शासनाचे यासाठी पूर्ण सहकार्य राहील. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तुम्ही शिकून कोणी मोठ्या अधिकारी व्हावे चांगल्या नोकरीला लागावे चांगले जीवन जगावे यासाठी शिक्षक प्रयत्न करत असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांनी पूजन केले. यावेळी मतदान नोंदणी अधिकारी श्री. साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते श्री.नकुल गायकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. कल्पनाताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री रवी भंडारी, शाळा सुधार समिती उपाध्यक्ष श्री. दिपक गायकवाड यांच्यासह शाळा व्यवस्थापन व शाळा सुधार समितीचे सदस्य, ग्रामस्थ पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापक नटराज मोरे सर, श्री दिपक भोईर सर शाळा व्यवस्थापक व सुधार समिती सदस्य, माजी विद्यार्थी सदस्य जान्हवी गायकवाड यांच्या व शाळेतर्फे आमदार साहेबांचा सत्कार करण्यात आला. आमदार श्री मोरे यांनी शाळा व शिक्षकांविषयी विचारपूस केली. मुख्याध्यापक श्री नटराज मोरे सरांची सेवानिवृत्ती होत असल्याने आमदार साहेबांनी त्यांना सन्मान करत पुढील यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक भोईर सर यांनी केले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .