जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथील शालेय व्यवस्थापन समिती ची स्थापना 15 सप्टेंबर 2025 रोजी झाली आणि त्याच दिवशी वाटले की आत्ता शाळेचे रूप बदलणार आणि आज 2 च महिन्यात हे सिद्ध झाले....
पण त्यासाठी निळा येथील सप्ताह समिती,समस्त गावकरी मंडळी,शिक्षणाप्रेमी, निळा येथील कर्मचारी वर्ग,तरुण वर्ग आणि ग्रामपंचायत चे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी खूप मोठा सहभाग घेतला...
दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी ज्या ज्या लोकांनी शाळा सुधारण्यासाठी मदत केली मार्गदर्शन केले त्या सर्वांचा एक विदयार्थी मार्गदर्शक मेळावा घेतला अर्थातच याचे श्रेय सप्ताह समिती आणि जोगदंड सर यांना जाते, त्यांनी गावाकऱ्यांचे मत शाळेच्या बाजूने वळवले आणि सुरु झाला आर्थिक जमवाजमव करण्याचा प्रयत्न, एका आठ दिवसातच गावकर्यांनी 40000 रुपये निधी जमा केला.
त्यात... जोगदंड मंडळी कडून 1- 10000 .कदम मंडळी कडून 10000 भीमजयंती मंडळाच्यावतीने10000 जोगदंड मंडळी कडून 2 - 10000 असा निधी जमा केला आणि प्रत्यक्ष कामास द्वितीय सत्र सुरु होण्याच्या पूर्व संधेस म्हणजे 2 नोव्हेंबर ला शाळेचे मैदान कोकल्याण लावून साफ करून दिले,त्यावर कबड्डी आणि खोखो चे अखलेले मैदान लाल माती टाकून तयार होणार आहे...
त्या नंतर गावातील सरपंच आदरणीय रोहित हिंगोले यांनी शाळेच्या बाहेरील बाजूस जितका कलर लागेल तितका कलर घेऊन दिला आणि सांगितले की छोटी छोटी दुरुस्ती ची कामे इथे सौचालय चे काम चालू आहे, मिस्त्री आहेत आणि रेती, सिमेंट, विटा पण आहेत तुम्ही थाम्बुन करून घ्या, आणि लगेच ज्या ज्या ठिकाणी दुरुस्ती करता येईन तिथे माल टाकून घेतलाशाळेसाठी ग्रामपंचायत कडून मुले आणि मुली यांच्यासाठी स्वतंत्र सौचालय कमोड सहित बांधून तयार झाले.
परिपाठच्या जागी झाडे होते त्यांच्या बाजूला विटा लावून लगेच गिलावा करून घेतला त्यासाठी शंकर हिंगोले गु्तेदार यांनी उदार मनाने पूर्ण सहकार्य करून गावातीलच सोनटक्के मिस्त्री लावून गिलावा करून दिला रॅम्प दुरुस्त करून दिला, झाडांच्या फ़ांद्या विस्तीर्ण आणि खाली लोंबत होत्या त्या सुद्धा कट करून घेऊन व्यवस्थित आकार दिला.शाळेचे पाणी मैदानात साचून चिखल होतं होता त्यावर उपाय म्हणून सर्व स्लॅप चे पाणी वॉटर हार्वेस्टिंग करून एका बाजूला करण्यात आले.
ग्रामपंचायत कडून शाळेसाठी आणखी एका खोलीचे बांधकाम आणि किचन शेड चि कामे पण या महिन्यात सुरु होणार आहेत. एकेकाळी गुणवत्ता पूर्ण आणि आकर्षक असलेली हीं केंद्रीय प्राथमिक शाळा निळा मरगळी /मोडकळीस आली होती पण आज तिचे रूप एकदम पालटले...
आणि यासाठी गावातील समस्त पालक वर्ग, तरुण वर्ग, कर्मचारी वर्ग, सप्ताह समिती, व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्य,सुरक्षा समिती, महिला पालक समिती आणि ग्रामपंचायत निळा चे सरपंच आणि ग्रामसेवक आणि विशेष म्हणजे जोगदंड सर हे या परिवर्तनाचे शिल्पकार ठरले..
समस्त गावकरी मंडळी चे शाळेच्या वतीने विशेष आभार !
-कैलास पिराजी पोहरे
(प्राथमिक शिक्षक )
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा ता.जि.नांदेड
संपर्क - 8766858531



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .