जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, हळदा येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक'

शालेयवृत्त सेवा
0




नांदेड / भोकर (शालेय वृत्तसेवा):

           देशाचा खरा आणि सजग नागरिक घडतो तो शाळेतूनच!" या उक्तीची प्रत्यक्षात अनुभूती भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, हळदा येथे नुकतीच आली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्व गुण, संविधानाची ओळख आणि शासन-प्रशासनाचे महत्त्व रुजावे, यासाठी शाळेत अत्यंत उत्साहात 'शालेय मंत्रिमंडळ निवडणूक' पार पडली.   निवडणुकीसाठी तब्बल २७ विद्यार्थ्यांनी उत्साह दाखवत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी चौघा विद्यार्थ्यांनी माघार घेतले .एक दिवसाच्या तुफान प्रचारानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. 


              या संपूर्ण रंगतदार प्रक्रियेतून अखेर दहा गुणवंत उमेदवार विजयी झाले असून, लवकरच त्यांच्या माध्यमातून शाळेचे नवे 'शालेय मंत्रिमंडळ' स्थापन होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागासोबतच केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गुट्टे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन व दिशादर्शन तसेच पदवीधर शिक्षक राज्यपुरस्कार प्राप्त पदवीधर शिक्षक मिलिंद जाधव यांनी निवडणुकीची उत्तम पूर्वतयारी करून घेतली . सहशिक्षिका वंदना इंगोले व सुजाता तिगोटे मॅडम यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. या उपक्रमाला भोकरचे गटशिक्षणाधिकारी अजय तरवटे , केंद्रप्रमुख नितीन सावरगावे , शिविअ अनिल सिरसाठ आदिंनी शुभेच्छा दिल्या . तसेच विनोद सोनटक्के, पापेश्वर पुलकंटवार , विशेष शिक्षक सुधांशू कांबळे यांनीही विद्यार्थ्यांच्या या गुणात्मक कार्याचे कौतूक केले .

   

उमेदवारी अर्ज दाखल करणे , फॉर्म उचलून घेणे, मतदान चिठ्ठ्या वाटप ,बॅलेट युनिटचा कल्पकतेने वापर , बोटाला शाई लावण्याची प्रक्रिया आणि मतमोजणी अशा टप्यानी राबविलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला. निवडणूकीत मतदाराच्या बोटाला शाई का लावतात ? अशा प्रकारच्या काही मनात दडलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना या वेळी मिळाली.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)