नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) : संविधान दिनाचे औचित्य साधून किनवट येथील राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक व साहित्यिक रमेश मुनेश्वर हे आकाशवाणी नांदेड केंद्रावरून 'संविधान दिन विशेष प्रासंगिक' सादर करणार आहेत. गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.
रमेश मुनेश्वर हे केंद्र शनिवारपेठ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरसांगवी (चि.) येथे कार्यरत आहेत. संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या 'कविता संविधानाच्या..!' या ७५ कवींच्या ७५ कवितांचा समावेश असलेल्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे संपादन त्यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे येथे प्रथम भाषा विषयाच्या समितीचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.
यापूर्वीही त्यांनी आकाशवाणी नांदेड केंद्राच्या 'युवावाणी' कार्यक्रमातून कविता वाचन केले आहे. आता संविधान दिनाच्या निमित्ताने आकाशवाणीवरून प्रासंगिक सादर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यांच्या या साहित्यिक व शैक्षणिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
हा कार्यक्रम आपण येथे प्रत्यक्ष ऐकू शकता 👇



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .