सकाळी 11 ते दुपारी २ पर्यंतच शाळा; 'या' तीन विषयांनाच द्या प्राधान्य.. पाचवी ते आठवीचे वर्ग 30 एप्रिलपर्यंतच !

शालेयवृत्त सेवा
0



सोलापूर (शालेय वृत्तसेवा):

 27 जानेवारीपासून शाळा सुरु होणार असून प्रजासत्ताक दिनी कोणत्याही विद्यार्थ्यांना बोलावू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत वर्ग भरणार असून इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांनाच प्राधान्य द्यावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत.


23 नोव्हेंबरपासून आतापर्यंत 21 हजार 287 शाळा सुरु झाल्या असून 22 लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत येऊ लागले आहेत. आता 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. राज्यभरात पाचवी ते आठवीपर्यंतच्या एक लाख सहा हजार 491 शाळा असून 78 लाख 47 हजार विद्यार्थी पाचवी ते आठवीत शिकत आहेत. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्या-त्या गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


दुसरीकडे शाळेतील प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करुन घेणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दररोज तीन तासापर्यंतच अध्यापन करावे आणि दुपारी दोननंतर शाळेत कोणत्याही मुलास थांबवून ठेवू नये, अशा सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना केल्या आहेत. दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत विद्यार्थ्यांची अपेक्षित उपस्थिती दिसून न आल्यास शाळेची वेळ सकाळी नऊ किंवा दहा ते दुपारी बारा किंवा एकपर्यंत करण्याचा विचार केला जाईल. शालेय शिक्षण विभागाकडून त्यासंबंधी मार्गदर्शन मागविले जाईल, असेही शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी सांगितले.


शिक्षणाधिकारी म्हणाले...

▪️27 जानेवारीपासून सुरु होणार पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा.

▪️प्रजासत्ताक दिनी मुलांना शाळेत बोलावू नये.

▪️शिक्षकांना कोरोनाची टेस्ट बंधनकारक

▪️दररोज मुलांचे तापमान तपासावे.

▪️शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने मुख्याध्यापकांनी करावे. 

▪️नियोजन.. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत भरतील पाचवी ते आठवीचे वर्ग; नववी ते बारावीच्या शाळांचीच नियमावली असेल लागू.

▪️पालकांच्या संमतीसाठी शाळांनी जनजागृती रॅली काढण्यावर भर द्यावा.

▪️मुले, शिक्षकांकडे मास्क बंधनकारक.

▪️30 एप्रिलपर्यंतच भरतील शाळा; 1 मेपासून विद्यार्थ्यांनी दिली जाईल सुट्टी.


शालेय शिक्षणमंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांच्या नविन आदेशाप्रमाणे 27 जानेवारी 2021 पासुन 11:00 ते 2:00 वेळात शाळा भरवायच्या संभाव्य नियोजनाबाबत..


🔶 Checking

(Temp (Below 98.5), oxy above 95)

11:00 to 11:20

   (20 miniuets)


 🔶 1st Period English

11:21 ते 12:00

   ( 40 Miniuets)


  🔶 2'd Period (Math

 12:01 to 12:40

      (40 Miniuets)


🔶 3'rd Period (Science)

(12:41 to 01:20)

    (40 Miniuets)


🔶 4'th Period

   (Other Subjects: Marathi / Hindi /Social Sciences)

 (01:21 to 2:00)

 (40 Miniuets)

_________________________________________



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)