शिक्षण ही निरंतर प्रक्रिया! ...रेणुका शेट्टी.

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

साऱ्या देशात कोरोना चे सावट आहे. परंतुु कोरोनाा आला आहे म्हणून सण-उत्सव साजरेे साजरेेे होणार नाही, असेेे कसे होणार? भारतीय मुळातच उत्सवप्रिय. संस्कृती परंंपरा जपणाारा. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस म्हणजे राष्ट्रीय उत्सव. कोरोनाााच्या काळात राज्य सरकारने व केेंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेेल्या आरोग्य विषयक सुचनांचे पालन करून देशात अनेेेक शाळा व महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. 


अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत शिक्षकांनी नेहमी प्रमाणेच प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात भाग घेतला. शाळेच्या वसतीगृहात विद्यार्थी नसले तरी हाँस्टेल मधील अनेक विद्यार्थ्यांनी आभासीरुपात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला. शाळेतील वरिष्ठ विद्यार्थी प्रिय शिक्षिका व गृहपाल श्रीमती रेणुका शेट्टी मँडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विज्ञान विषय प्रमुख व हाँस्टेल मधील गृहपाल म्हणून त्या निवृत्त होत आहेत. 

शिक्षण ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया यामुळे मी जरी निवृत्त होत असली तरी शिक्षण कधी संपणार नाही व मी अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून कधी निवृत्त होणार नाही असे प्रतिपादन रेणुका शेट्टी मँडम यांनी केले. 

भारतीय लोकांचा आत्मविश्वास व लढाऊवृत्ती यामुळेच कोरोनाच्या संकटावर आपण लवकरच मात करु असा आत्मविश्वास या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविंद राजन श्रीनिवासन यांनी उत्कृष्टपणे केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)