कोविड ने शिक्षणात अनेक संधी निर्माण केल्या - शिक्षण संचालक दिनकर पाटील

शालेयवृत्त सेवा
0

 



ATM राज्यस्तरीय कार्यक्रमात अजय काळे यांचा सन्मान..

पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
कृतीशील शिक्षक महाराष्ट्र (ATM) ने पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असलेले मा. संचालक तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षण मंडळाचे मा. श्री दिनकर पाटील साहेब यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी मा. डॉ. वसंत काळपांडे साहेब ( माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य ) व इतर मान्यवर उपस्थित होते.

17 जानेवारी 2021 रोजी  नाथ पै हॉल,साने गुरुजी स्मारक,राष्ट्र सेवा दल,सिंहगड रोड,पुणे येथे झालेल्या Active Teachers Maharashtra (ATM)  द्वारा आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात मा. दिनकर पाटील साहेब व  मा.वसंत काळपांडे साहेब यांच्या हस्ते  शैक्षणिक व लेखन क्षेत्रातील  कार्याची दखल घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दहिवडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्रीअजय काळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री पाटील साहेब पुढे म्हणाले की, कोविड ने सामान्य माणसाला अनेक गोष्टी नव्याने शिकवल्या अगदी तसेच शिक्षण क्षेत्राला सुद्धा नवीन गोष्टी शिकवल्या यात ऑनलाईन शिक्षण ही एक फार मोठी देणगी आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरु या यशस्वी कार्यक्रमाबद्दल अत्यंत विस्तृतपणे उपस्थित राज्यभरातील शिक्षकांशी चर्चा केली. डॉ. वसंत काळपांडे साहेब यांनी सन्मनार्थीचे कौतुक करताना शिक्षक आता वाचन व लेखन करु लागल्याबद्द्ल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग व आठवणी सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या  आयोजनामागील भूमिका राज्य सह संयोजक ATM ज्योती बेलवले मॅडम यांनी मांडली तर ATM च्या कार्यप्रणालीची माहीती व पुढील दिशा यावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष व ATM चे राज्य संयोजक श्री विक्रम अडसूळ यांनी संवाद साधला.

पुणे ATM ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी मा.प्राची साठे (शिक्षण अभ्यासक), मा.प्रदीप लोखंडे(सामाजिक कार्यकर्ते),
मा.डॉ.विशाल तायडे (DIET औरंगाबाद), मा.अश्विनी सोनवणे,(गटशिक्षणाधिकारी भोर), मा.ज्ञानदेव नवसरे(राज्य सहसंयोजक ATM),मा.उमेश कोटलवार(राज्य सहसंयोजक ATM) व  शिक्षक
उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)