राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण करणार! - शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

शालेयवृत्त सेवा
0

 

(आज मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शालेय शिक्षण विभागाच्या वर्ष पुर्तीच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मा उपमुख्यमंत्री अजित पवार, मा अशोक चव्हाण, मा अमित देशमुख, मा नितीन राऊत व इतर मंत्री मंडळातील सहकारी उपस्थित होते.)


मुंबई ( उदय नरे ) :

(Strengthening Teaching-Learning And Results for States) STARS कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास मान्यता देणेबाबत. प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज मंत्री मंडळातील कँबिनेट बैठकित मांडला समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाखाली पूर्व प्राथमिक ते इ.१२ वी या वर्गामध्ये दर्जेदार शिक्षण देणे आणि अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ करणे, सामाजिक, लिंग भेदभाव न करता शिक्षणाचा दर्जा राखणे या बाबींचा समावेश सर्व पातळीवर करुन ठराविक दर्जाचे शिक्षण शाळांमध्ये देणे हे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. माध्यमिक शाळा स्तरावर व्यवसाय शिक्षण देणे व SCERT आणि DIETS या संस्थेचे सक्षमीकरण व उच्चीकरण करणे यांचा अंतर्भाव या योजनेखाली करण्यात आला आहे.


जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या राज्यातील शिक्षण पध्दतीतील अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण (Strengthening Teaching- Learning and Results for States) (स्टार, या प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह एकुण सहा राज्यांची (हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, ओडीसा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ) Performance Grading Index मधील कामगिरीच्या आधारे निवड करण्यात आली आहे.


सदर प्रकल्पासाठी एकुण पाच वर्षां मध्ये केंद्र शासनाचा 585.83 कोटी व राज्य शासनाकडून 390.56 कोटी रुपयांची इतक्या नियतव्ययाची आवश्यकता आहे. 


STARS प्रकल्पाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. १. प्राथमिक ते इ.१२ वी मधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि नियमित व गतीशील प्रयत्नाने अध्ययन निष्पत्ती सुधारण्यावर भर देणे. २. योग्य व एकात्मिक शिक्षण देण्याच्या प्रयत्नावर भर देणे. ३. शाळांचे प्रशिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर भर देणे, शैक्षणिक व्यवस्था पारदर्शक बनविण्यासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करणे. ४. राज्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शालेय प्रशिक्षण सुधारणे. ५. विशेष गरजा असणारी बालके, मुली आणि वंचित समुदायातील विद्यार्थी यांच्यावर विशेष लक्ष देणे.प्रकल्पामध्ये प्रगती श्रेणीकरण दर्शकानुसार (Performance Grading Index) खालील बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे :

स्टार प्रकल्पामध्ये प्रगती श्रेणीकरण दर्शकानुसार खालील बांबीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 


पूर्व प्राथमिक (Early Childhood) शिक्षणाचे सशक्तीकरणशाळेच्या वर्ग खोल्यांची रचना, शिक्षकांना आंनददायी शिक्षण देता यावे यासाठी अध्ययन साहित्याचा दर्जा निश्चित करणे, शिक्षकांना सेवांतर्गत व्यावसायीक शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणे, प्रशासकीय आणि शैक्षणिक संनियंत्रणासाठी आवश्यक सुविधा तयार/निर्मिती करणे, पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये प्रायोगिक तत्वावर काही आदर्श शाळा सुरू करून त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करणे.


अध्ययन मुल्यांकन (assessment / tests) पद्धतीत सुधारणा करणे.

अ) आंतरराष्ट्रीय अध्ययन पध्दती कार्यक्रम (Program for International Student Assessment) शिक्षकांना अध्यापन कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण देणे, जागृती निर्माण करणे, अध्ययनापूर्वीची तयारी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अहवाल प्रसिध्दी, राष्ट्रीय फलनिष्पत्ती सर्वेक्षणाबाबत रचना करणे, परीक्षा पध्दतीची तांत्रिक रचना करणे इत्यादी.


ब) अभ्यासक्रम पध्दतीत सुधारणा - परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती, शिक्षकांच्या प्रशिक्षण व व्यक्तीमत्त्व विकास घडविण्यासाठी परीक्षांचा मुल्यांकन आकडेवारीचा वापर, एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्याबाबत असलेले आव्हान, राज्य स्तरावर अध्ययन निष्पत्ती सर्वेक्षण करणे, विविध शाळा परीक्षा मंडळाद्वारे परीक्षा पध्दतीत सुधारणा.


३) शिक्षकांचा प्रशिक्षणाद्वारे विकास करून वर्गातील अध्ययन व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अध्ययन आणि त्यांचा व्यक्तीमत्त्व विकास.


 1) शिक्षकांचा विकास :

तंत्र शिक्षणाद्वारे अध्ययन पध्दतीमध्ये सुधारणा SCERT, DIET / BRC द्वारे नियमित अंतराने शिक्षकांचे प्रशिक्षण व त्यांच्या ज्ञानाची तपासणी करणे, DIET / BRC यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, संगणकीकरण, CRC द्वारे शैक्षणिक पर्यवेक्षण,

 ii) शाळेच्या वर्गातील अध्ययन पध्दतीत सुधारणा :

शिक्षकांचा प्रशिक्षणाद्वारे विकास करून वर्गातील अध्ययन व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अध्ययन आणि त्यांचा व्यक्तीमत्त्व विकास.


शिक्षकांचा विकास:

तंत्र शिक्षणाद्वारे अध्ययन पध्दतीमध्ये सुधारणा SCERT, DIET / BRC द्वारे नियमित अंतराने शिक्षकांचे प्रशिक्षण व त्यांच्या ज्ञानाची तपासणी करणे, DIET / BRC यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, संगणकीकरण, CRC द्वारे शैक्षणिक पर्यवेक्षण.

ii) शाळेच्या वर्गातील अध्ययन पध्दतीत सुधारणा :

अध्ययन पध्दतीत सुधारणा करण्याचे धोरण ठरविणे त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे. प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक पातळीनुसार गरजा निश्चित करून त्यानुसार त्याला ठराविक शैक्षणिक पातळीवर अध्ययन करणे.

 iii) शाळेचे नेतृत्व :

शाळेचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक ते नेतृत्व विषयक व आवश्यक नियोजन करणे व व्यावसायीक विकासाबाबत प्रशिक्षण शाळा ते काम/ शाळा ते उच्च शिक्षण हे संक्रमण सुलभ करणे.


मुलांना शिक्षण पूर्ण करून व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण, वयानुसार अभ्यासक्रम विकास करणे. उच्च शिक्षण घेण्यासाठी क्षमता निर्माण करणे, यासाठी शिक्षकांचे आवश्यक त्या क्षेत्रात प्रशिक्षण.


व्यावसायीक शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची नियुक्तीपूर्व परीक्षा घेणे. मुलांमध्ये व्यावसायीक होण्यासाठी Career Counselling करणे. त्यांना प्रशिक्षणानंतर वेगवेगळ्या औद्योगिक समुहात Internship उपलब्ध करून देणे.


५) प्रगत सेवा पुरविण्यासाठी प्रशासन व विकेंद्रीत व्यवस्थापन करणे. शिक्षकांची उपस्थिती, पारदर्शक निवड व नियुक्ती पध्दती, नियमित पर्यवेक्षण व तपासणी या सर्व बाबींचे संगणकीकरण करणे, कार्यक्रमाच्या नियोजन व अंमलबजावणीकरिता शाळा व विद्यार्थ्यांच्या माहितीचा योग्य वापर करणे. शिक्षकांच्या सेवापुस्तकांचे तसेच शिक्षकांच्या प्रशिक्षणांच्या व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, अध्ययन कौशल्यात सुधारणा करणे.


४. प्रकल्पाची अंमलबजावणी:

प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी NCERT कडून तांत्रिक व शैक्षणिक सहाय्य तसेच NIEPAमार्फत राज्यातील शिक्षकांमधील क्षमतेच्या नेतृत्वगुणांचा विकास करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर शिक्षणासाठी स्वतंत्र लोकपालसदृष यंत्रणा गठीत करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण देणे व शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा दर्जा उंचावणे याशिवाय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील साध्य व मुल्यांकनाच्या पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी मुल्यांकन केंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.


समग्र शिक्षा अभियानाच्या एकात्मिक राज्य अंमलबजावणी सोसायटी (SIS) द्वारे STARS प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील निरिक्षणाची कामे जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याद्वारे केली जातील तर जिल्हाधिकारी/ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे जिल्हा शिक्षण समितीचे प्रमुख असतील. सदर कार्यालय जिल्ह्याचा प्रकल्प विषयक वार्षिक कृती आराखडा आणि अर्थसंकल्प तयार करेल आणि प्रकल्पाची भौतिक आणि आर्थिक प्रगती यावर देखरेख ठेवेल.


जिल्हाधिकारी/ मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गट शिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकांचा समावेश असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)