मुंबई ( उदय नरे ):
भारत सरकारच्या संरक्षण विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेना ही तरुणांची सर्वात मोठी संघटना आहे.आणि या राष्ट्रीय छात्र सेनेच्या अधिकारी कँप्टन मालिनी शर्मा यांना रक्षा राज्य मंत्री प्रशंसा पुरस्कार प्राप्त झाला या बद्दल शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केले.
एन. सी. सी म्हणजे एकता आणि अनुशासन. यामुळेच आज स्वयंम शिस्त व राष्ट्रिय एकात्मतेसाठी विद्यार्थिंनिंनी जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रीय छात्र सेनेत सहभागी व्हायला हवे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले. भारत सरकार संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत्या एन. सी. सी. अधिकार-यांसाठी अत्यंत मानाचा व प्रतिष्ठित पुरस्कार अंधेरी येथील भवन्स काँलेजच्या आर्मी एन. सी. सी. अधिकारी मालीनी शर्मा यांना प्राप्त झाला. गेली सोळा वर्षे कँप्टन मालीनी शर्मा अनेक विद्यार्थिंनीना एन. सी. सी. चे प्रशिक्षण देत आहेत. देशासाठी तरुणपिढीला सक्षम घडवण्याचे काम कॅप्टन मालीनी शर्मा करत आहेत त्यांच्या शैक्षणिक व व एन. सी. सी. कार्याचे योगदान पाहूनच " रक्षा राज्य मंत्री प्रशंसा पत्र" संरक्षण विभागाने बहाल केले आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्यावर कँप्टन मालीनी शर्मा यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्याची माहिती दिली. देशातील सैन्य दलात देशसेवेसाठी तरुण पिढीला घडवणार्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्याचे कौतुक शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .