महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती तालुका शाखा जतच्या वतीने क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार व क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले आदर्श केंद्र प्रमुख व शिक्षक पुरस्कार देण्यात आलेल्या दरिबडची व आसंगीतुर्क केंद्रातील शिक्षकांचा आसंगीतुर्क केंद्राच्या वतीने गौरव
सांगली ( दिलीप वाघमारे ):
करेनहट्टी जिल्हा परिषद कन्नड शाळेत येथे आसंगीतुर्क केंदाच्यावतीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा जत च्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई बाई फुले आदर्श शिक्षिका व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले आदर्श केंद्र प्रमुख व आय एस ओ शाळा पुरस्कार प्राप्त सन्माननीयांचे आसंगीतुर्क केंद्राच्यावतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एम.सी. अध्यक्ष माळी होते.मान्यवरांच्या हस्ते पुजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले आदर्श केंद्र प्रमुख पुरस्कार मिळाल्या बदल दरिबडचीचे केंद्र प्रमुख रमेश राठोड व दरीबडची केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक लक्ष्मण शेळके ,आय.एस.ओ.मानाकंन प्राप्त बाबरवस्ती ( पांडोझरी) शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाघमारे, शिवाजी गायकवाड पांढरेवाडी, मुख्याध्यापक मनगेनी कुलाळ घुमरेवस्ती,धनराज मेंढेकर मोटेवाडी,दरीबडची कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मीबाई बमदे या सर्वांचे केंद्राच्या वतीने या सर्वाना आदर्श पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार,शिक्षक ध्येय विशेष अंक देऊन गौरव करुन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमावेळी रामचंद्र राठोड बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाबरोबरच नीती मूल्यांचे व समाजाप्रती संवेदनशील भावना व्यक्त करणारे माणुस बनवणारे शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी विचार मांडले. तसेच दरिबडचीचे केंद्र प्रमुख म्हणाले की शिक्षकांनी .कठोर परीश्रम, ध्येयाप्रतीचा ध्यास व सकारात्मक दृष्टिकोन हीच यशाची त्रिसूत्री त्यांनी सांगितली.आवड व छंदालाच आपले ध्येय मानून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे.
अनेक यशवंत व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रम प्रसंगी शिक्षक समितीचे तालुका सरचिटणीस चनबसू चौगुले, तालुका नेते एम. बी चव्हाण, सुभाष हुवाळे, मोहन चौगुले, शांतीलाल नाईक, बसाप्पा पुजारी,शिवाप्पा राठोड ,शंकर शिंगाडे,शशिकांत सावंत ,चव्हाण गोविंद,नरळे शिवयोगी,मोकाशी हरिदास,फुलसिंग राठोड,बर्डे प्रकाश,बालाजी खुपसे ,शिंदे प्रकाश,फिलिप कोकणी ,मल्लिकाअर्जुन माळी,करेनहट्टी चे मुख्याध्यापक रमेश राठोड,व इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी पालक व धुळकरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माळगोंडे आभिजीत पांढरेवाडी व आभार घोडे सर मोटेवाडी यांनी मानले. विशेष सहकार्य करेनहट्टी शाळेतील मुख्याध्यापक रमेश राठोड, चंद्रशेखर पुजारी,माळी सर व येंदे सर यांचे लाभले .


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .