नांदेड ( मिलिंद जाधव ):
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगळी केंद्र पळसा ता.हदगाव जि. नांदेड येथील उपक्रमशील शिक्षक तसेच कवी व साहित्यिक मनोहर बसवंते यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा नांदेड यांचेकडून उत्कृष्ट साहित्यनिर्मिती,काव्यनिर्मिती तसेच शाळेला आय एस ओ दर्जा मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल त्यांना विशेष गुणवंत शिक्षक पुरस्कार नांदेडच्या कुसुम सभागृहात समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, नांदेड मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सन 2019 मध्ये तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक मनोहर बसवंते यांनी जि प प्रा शा पिंगळी या शाळेला आय एस ओ दर्जा प्राप्त करून दिला आहे.शि वि अ श्रीमती वैशाली आडगावकर मॅडम,केंद्रप्रमुख एम पी शेख साहेब,केंद्रीय मु अ श्री कुमारस्वामी माने आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री मुळावकर आर आर यांच्या नियंत्रणाखाली आणि श्री स्वामी एस एस,कांबळे एस पी,श्रीमती टाले व देवक्तते मॅडम,मधुकर बुरपल्ले,पाटील एस एस,टोम्पे व्ही .जी.,एम .एफ. राठोड,नारायण सोनटक्के यांच्या सहकार्याने शाळेस आय एस ओ 9001-2015 दर्जा मिळवण्यासाठी पुढाकार घेऊन शाळा आय एस ओ केली आहे.जि प प्रा शा पिंगळी आय एस ओ मानांकन प्राप्त करणारी हदगाव तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे.
श्री. मनोहर बसवंते हे कवी आणि लेखक असून त्यांचे लिखाण अनेक प्रसिद्ध वर्तमानपत्रे तसेच नियतकालिकांतून तसेच समाजमाध्यमातून प्रकाशित झाले आहे. प्रेरणेमुळे मनुष्य अधिक जोमाने कामाला लागतो तर पुरस्काराने त्या केलेल्या कामाला पावती मिळते. आज त्यांना विशेष गुणवंत पुरस्कार मिळाल्याने त्यांचे मुख्याध्यापक मुळावकर सर आणि सर्व सहकारी तसेच मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन करून स्वागत केले आहे.
अगदी योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याबद्दल अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा शाखा नांदेड यांचे सर्व शिक्षकमित्रांनी आभार व्यक्त केले. तसेच अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच नांदेडच्या पदाधिकार्यानी अभिनंदन केले आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .