नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :
नुकतीच नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधिक्षक मा श्री उदय देवरे साहेब यांची भेट घेऊन चर्चा करून मार्ग काढला त्यात प्रामुख्याने
1) नाशिक जिल्ह्यातील विनाअनुदानित वरून 20% अनुदानास पात्र ठरलेल्या व20%वरून 40% अनुदान प्राप्त होणाऱ्या सर्व शाळांच्या अनुदानाचे सर्व बीले 31मार्च पर्यंत देणे.
2) 1901या हेड खालील 3 शाळा 10 तुकड्या यांचे डिसेंबर 20 व जानेवारी 21ची बीले पारित झाल्या नंतर उर्वरित जानेवारी, फेब्रुवारी 21 चे बीले 31 मार्च पर्यंत अदा करण्याचे आश्वासन दिले.
3) यापूर्वीचे थकित बीले(वैद्यकीय बीले , सातव्या वेतन आयोगाचा फरक व इतर फरक बीले) मंजूरीसाठी पुणे संचालक कार्यालयाकडे पाठवले असता त्यांची मंजुरी आल्याबरोबर 31मार्च 21च्या आत पारित करण्याचा प्रयत्न राहिल .
4 ) ज्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी परतावा व ना परतावा ही प्रकरणे प्रलंबित असतील ती त्वरीत निकाली काढण्यात येतील.
5) भविष्य निर्वाह निधी मधील प्रकरणाबाबत वैद्यकीय आणि घरातील मंगल कार्यासाठी प्राधान्याने बीले पारित करण्यात येतील.
6) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण ही प्रकरणे त्वरीत पारित करण्याचा प्रयत्न आहे .
वरील सर्व बाबतीत सविस्तर चर्चा झाली असून सदरची कार्यवाही मार्च अखेरपर्यंत करण्यासाठी माझा 100% प्रयत्न राहील असे आश्वासन पे युनिट चे अधिक्षक श्री. उदय देवरे साहेब यांनी दिले.
याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री एस के सावंत , कार्याध्यक्ष श्री एस बी शिरसाट , सचिव श्री एस बी देशमुख उपाध्यक्ष श्री प्रदिप सांगळे , श्री पुरूषोत्तम रकिबे ,प्रसिद्धीप्रमुख श्री बी के नागरे , अनिल माळी ,एन . वाय पगार, शरद गिते, एस. एस . जगदाळे, अनिल देवरे , सुभाष भामरे, आर . टी . जाधव, आर . एस . गायकवाड एस . के . चकोर तसेच विनाअनुदानित कृती समितीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री भरत भामरे . विभागीय अध्यक्ष श्री कांतीलाल नेरे ,श्री एस. एस .जगदाळे राजाराम मोरे, गोकुळ महाले, एस. एस . ढाकणे, सुनिल डुक्रे आदि उपस्थित होते.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .