सुर्योदया सायन्स फाउन्डेशन पुणे यांच्यातर्फे राज्यस्तरीय आॅनलाईन विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न. .

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड (शालेय वृत्तसेवा) :

सूर्योदया सायन्स फाउन्डेशन ही विनाअनुदानीत सेवाभावी संस्था असून ग्रामीण भागातील वंचितासाठी व आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. शिक्षणाला कृतीची जोड मिळावी यासाठी कोवीड -१९च्या प्रादूर्भावामुळे राज्यातील मुलांसाठी आॅनलाईन विज्ञान प्रयोग सादरीकरण संपन्न झाले. 


यामध्ये नांदेड, लातूर, परभणी, पुणे, जालना, अहमदपूर, बारामती येथून मुलांनी सहभाग घेवून आपले प्रयोग सादर केले. प्रस्तुत स्पर्धा दोन वयोगटात गटात घेतली. वर्ग १ ते ५ आणि वर्ग ६ ते ९ या दोन वयोगटातील मुलांनी सहभाग नोंदवला. पाण्याची घनता, ज्वलनासाठी आॅक्सीजनची गरज असते, जलचक्र, बायोगॅस निर्मिती, पाण्याचे प्रदूषण अशा वेगवेगळ्या विषयावर मुलांनी प्रयोग सादर केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आस्ट्रिया देशातून जोडलेले संस्थापक अध्यक्ष तथा वैज्ञानिक डाॅ श्री नरेंद्र ढेले यांनी सहभागी मुलांना विज्ञानविषयक मार्गदर्शन केले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ सौ निरामया मुचाटे यांनी केले. सुत्रसंचलन सौ संपदा बडवे यांनी केले.श्री रमेश अरकेल वैज्ञानिक, श्री होळे सर, श्री संतोष राऊत, सौ पुजा मजगे, सौ उषा नळगिरे यांनी निरिक्षक म्हणून सहभाग नोंदवला. सर्व सहभागी मुलांना डिजीटल सहभाग प्रमाणपत्र दिले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. लाॅकडाऊन काळातील या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)