रमजान ईद पुर्वी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पगार करण्यात यावी- शेख अब्दुल रहीम

शालेयवृत्त सेवा
0

 



हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन व मेयार अससोसिएशन तर्फे संयुक्त निवेदन सादर!


औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :

सध्या मुस्लिम बांधवाचा पवित्र  रमजानचा महिना सुरू आहे. रमजान ईद हा मुस्लिम बांधवासाठी एक मोठा सण असतो. रमजान ईद ही वर्षातून एकदा येत असल्याने व १४ मे रोजी (चंद्र दर्शन प्रमाणे) रमजान ईद मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात. 


ईदच्या वेळी नवीन कपडे, वस्तू खरेदी करतात. मुस्लिम बांधव याच महिन्यात आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या २.५% ही गोर-गरीबांना दान (जकात देणे) करुन पुण्य पदरात पाडत असतात, पर्यायाने आर्थिक टंचाई येऊ नये म्हणून राज्यातील सर्व खाजगी, मनपा आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहे एप्रिल 21 चे वेतन व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची मार्च व एप्रिल 21 चे वेतन ईद पूर्वी म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांत म्हणजे 8 मे 21 पूर्वी करण्यात यावी. 


अशी विनंती हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मेयार अससोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी एका निवेदनाद्वारे शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक ) पुणे तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), आणि वेतन अधीक्षक (प्राथमिक व माध्यमिक) कोरोना च्या पार्श्वभूमीवर ईमेल आणि व्हाट्सएपच्या द्वारे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)