कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थांचा आॕनलाईन सहभाग.
प्रा.दिपक अंबरते मुलांना इतिहास लेखन करण्याचे देत आहेत धडे
रायगड ( शालेय वृत्तसेवा ) :
स्थानिक इतिहास लेखन करुन तो समाजापुढे आला पाहीजे व महाराष्ट्रातील गड किल्यांची माहीती मुलांना व्हावी तसेच विद्यार्थामध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी यासाठी "रायगड किल्ला आॕनलाईन इतिहास लेखन कार्यशाळा" दिनांक 20 एप्रिल 2021 ते 30 एप्रिल 2021 या दरम्यान आॕनलाईन आयोजन करण्यात आली.यामधे कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील अनेक विद्यार्थांकडून आॕनलाईन भरघोस प्रतिसाद मिळाला.
लाॕकडाऊन मधे मुलांना शाळा बंद आहे त्यामुळे घरी कंटाळवाने वाटत आहे.शाळा सुरु असताना सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यामधून सुप्त गुनांचा विकास होतो.हाच विचार करुन प्रा.दिपक अंबरते कान्होजीबाबा कनिष्ठ महाविद्यालय अंजनसिगी यांनी या कार्यशाळा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थांकडून रायगड किल्ला विषयी इतिहास लेखन करुन घेतला.
कार्यशाळा साठी प्रा.श्रीधर जाधव वाशिम,प्रा.रमेश नांदेकर चिखलदरा,प्रा.गोपाल राठोड अकोला,प्रा.रंजन चौधरी यवतमाळ या इतिहास तज्ञ मंडळाद्वारे आॕनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे स्थित एक किल्ला आहे. रायगड( रायरी) किल्ला जावळीच्या राजे चंद्र रावजी मोरे यांनी बांधला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्याकडून जिंकला आणि १६७४ मध्ये रायरी चा रायगड म्हणून आपल्या मराठी साम्राज्याची राजधानी प्रस्थापित केली, त्याकाळात मराठी साम्राज्य मध्य आणि पश्चिम भारतात पसरली होती.
हा किल्ला सध्या भारत सरकारच्या नियंतरणाखाली आहे तरी जनतेसाठी खुला आहे.
आधीचे नियत्रक
मराठा साम्राज्य (१६५६-१६८९)
मुगल साम्राज्य (१६८९ -१७०७)
मराठा साम्राज्य (१७०७-१८१८)
युनायटेड किंगडम ईस्ट इंडिया कंपनी (१८१८-१८५७)
ब्रिटिश राज (१८५७-१९४७)
भारत (१९४७-)
हिरोजी इंदुलकर निर्मित हा किल्ला समुद्राच्या सपाटी पासून ८२० मीटर (२७०० फूट) उंच आहे आणि सह्याद्री पर्वत रांगेत आहे. किल्ल्याकडे जाण्यासाठी सुमारे १७३७ पायऱ्या आहेत. रायगड रोपेवे चा वापर करून 10 मिनिटांत किल्ल्याच्या शिखरावर पोहचण्याची सोय आहे. १८१८ मध्ये इंग्रजांनी कब्जा केल्यानंतर रायगड किल्याचा काही भाग इंग्रजांनी लुटला आणि नष्ट केला आहे.
किल्याचा इतिहास..
१६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकल्या नंतर राजे चन्द्ररावजी मोरे, जावळीच्या राजा आणि चंद्रगुप्त मौर्य कुटुंबाचा वंशज म्हणून राईचा किल्ला म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजींनी हा किल्ला पुन्हा बांधले आणि विस्तारित केले व त्याचे नाव रायगड (राजा किल्ला) असे ठेवले. हे छत्रपती शिवाजी मराठा साम्राज्याचे राजधानी बनले.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड आणि रायगडवाडी हे गाव आहेत. रायगडमधील मराठ्यांच्या शासनकाळात या दोन गावांना फार महत्वाचे मानले गेले. रायगडाच्या किल्ल्याच्या वरच्या चढावर पाचाडपासून सुरु होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनकाळात, पाचाड गावामध्ये दहा हजार सैनिक नेहमीच असायचे. अशी खुप मोठी माहीती मुलांनी संग्रहीत केली.
या कार्यशाळा मधे कु.राजश्री गुडधे,स्नेहल ठाकरे,प्रणाली ठाकरे,प्राची वाघमारे,गायत्री डाहे,गायत्री राठोड,आचल धांदे,तेजस वेलथरे,अनुराधा वरठी,आकाश टिकले,सुरज डाहे,वैष्णवी टिकले,संकेत पाटिल,गजानन गायकवाड,दर्शन सोनकुसरे,प्रेम बाभुळकर,रोहण उईके,आकांक्षा मेश्राम,कल्याणी लवणकर,श्रावणी फिरके,किरण कनोजे,निखील उईके,निखील ढोले,अर्जुन चौधरी,अजय इरपाते,मयुरी कुंभरे,वैष्णवी शेळके,पुजा उईके,निकिता राउत,किरण कनोजे,वंश ठाकरे,जय मारबदे,अंकिता तिनघसे,रामेश्वर सेलोकार,सुरज चौधरी,रीतेश वाघमारे,ज्ञानदिप पटवे,हर्षल मोहणकर,श्रीकांत आमले,प्रगती चौधरी,स्नेहा चोंदे,शुभांगी डाहे,करण कन्नाके,सुरज भोयर वैभवी जावतकर,अनुषा राउत,प्रीयल गवई,साक्षी ठोंबरे यांनी आॕनलाईन सहभाग घेतला.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .