( चित्र : रामचंद्र इकारे )
मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जागतिक बँकेने त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
जागतिक बँकेने जगभरातील शिक्षकांचा सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याची उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जगभरातील बारा जणांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यापैकी एक डिसले गुरुजी आहेत.
'शालेयवृत्त ' शैक्षणिक न्यूज वेब पोर्टल कडून गुरुजींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .