प्रयत्नशिल राहुन विद्यार्थानी अडचणी दूर कराव्यात...प्रा.अतुल ठाकरे

शालेयवृत्त सेवा
0

 


अमरावती (प्रा. दीपक अंबरते ) :           

अशोक शिक्षण संस्था अशोकनगर द्वारा संचालित श्री.कान्होजीबाबा कनिष्ठ महाविद्यालय अंजनसिगी तर्फे आज दिनांक 3/6/2021 ला प्रा अतुल ठाकरे आर्वि यांनी  शिक्षण,आदर्श जिवणाचा आधारस्तंभ या विषयावर आॕनलाईन वेबिनार द्वारा राज्यभरातील शिक्षक, प्राध्यापक ,विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. सर्वाग सुंदर जीवन जगणे म्हणजे जिवण होय.तुमच्या मधिल असलेल्या कला अनेक माध्यमातून व्यक्त करा.शाळा महाविद्यालय सुरु होईपर्यत स्वताची काळजी घ्या.जिवनात मित्र तयार करा.मित्र हा आरशासारखा असावा. बेईमान लोकांपासून सावध राहा.


आपल्या मधे प्रामाणिक पणा निर्मान करण्याचा प्रयत्न करा.प्रयत्नशिल राहून सातत्य ठेवा.यश मिळो अथवा अपयश प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे सुरु ठेवा.जगलास तर असे जग,कुणालाही हेवा वाटावा,मग हरलास तरी हरकत नाही,पण तुझा पराक्रम हा नवा वाटला पाहीजे.शाळा अनेक घटका पैकि एक आहे.अनुभव आपला गुरु आहे.चांगली पुस्तके वाचा.पुस्तकाने आपल मस्तक सुधारत आणी नंतर ते मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही.आपली बलस्थाने शोधा. छत्रपती संभाजी महाराजांचे विचार व जिवनचरीत्राचे वाचन करा.जिवणात खुप उपयोगी पडेल.असे प्रतीपादन प्रा.अतुल ठाकरे यांनी केले.


या कार्यशाळा ला आॕनलाईन प्रा.अनुराधा बाजड, प्रा.डाॕ.मिनाक्षी भांदककर,प्रा.डाॕ.प्रतिभा काळमेघ यवतमाळ , प्रा.उज्वला चांबटकर ,प्रा.डाॕ.प्रतिभा सहारे चांदूररेल्वे , प्राचार्य भाऊराव गाढवे, प्रा.डाॕ.अमित धांदे मंगरुळ दस्तगीर ,लिलाधर देशमुखसर, विनोद इंगोलेसर, शेखर झाडेसर, तसेच अशोक महाविद्यालय चांदूररेल्वे , कान्होजीबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंजनसिगी , कुर्हा कनिष्ठ महाविद्यालय कुर्हा येथिल विद्यार्थी आॕनलाईन उपस्थित होते.  सुत्रसंचालन प्रा,दिपक अंबरते यांनी केले.आभार प्रा.किशोर देशकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)