पोषण आहार अनुदान पालकांच्या बँक खात्यात जमा होणार.. पूरोगामी च्या प्रयत्नाला यश.!

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड (शालेय वृत्तसेवा):

उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहाराचे अनुदान शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डी. बी. टी. द्वारे थेट हस्तांतरित करण्याबाबत २५ जून रोजीच्या पत्रान्वये शिक्षण संचालक प्राथमिक यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना  कळविले होते. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची बँक खाती उघडणे हे अडचणीचे जिकरीचे व आर्थिकदृष्ट्या न परवडणारे असल्याने पुरोगामी शिक्षक संघटनेने सदर अडचणीची* तात्काळ दखल घेत  २९जून रोजी  राज्याचे शिक्षण संचालक प्राथमिक यांना ई-मेलद्वारे निवेदन देऊन सदर पोषण आहाराचे अनुदान पालकांच्या खात्यात वर्ग करण्याची विनंती निवेदनाद्वारे केली होती.  


  सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शालेय शिक्षण विभागाकडून  १३जुलै रोजी  शिक्षण संचालकांना शालेय पोषण आहाराचे अनुदान पालकांच्या बँक खाती वर्ग करण्याची सूचना लेखी पत्राद्वारे देण्यात आली आहे त्या अनुषंगाने राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी  स्वाक्षरी चे निवेदन दिले होते. राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  शिक्षणाधिकारी यांना शालेय पोषण आहार अनुदानासाठी पालकांची बँक खाती ग्राह्य धरली जाणार असल्याचे  पत्र निर्गमित केले जाणार  असून या निर्णयामुळे राज्यातील पालकांना दिलासा मिळाल्याने पुरोगामी  शिक्षक  संघटनेच्या केलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे.अशी माहिती राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)