किनवट ( शालेय वृत्तसेवा ) :
प्रधानसांगवी केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मातोश्री कमलबाई ठमके कोठारी शाळेत नुकतीच संपन्न झाली. शिक्षण परिषदेत डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. जंम्पलवाड सर यांनी अंतरजालाच्या सहाय्याने , अभासी पद्धतीने उपस्थितांसी संवाद साधला. तसेच श्री सुपडा माटे सर वेधश्रोत महाराष्ट्र राज्य, यांनी भविष्यवेदी शिक्षणात, विद्यार्थाची भुमिका व शिक्षकाचे मार्गदर्शन या विषयावर अभासी पद्धतीने शिक्षकांशी संवाद साधला. पर्यावरण व मानवी जीवन यावर श्री सुनील खामकर , वनरक्षक तथा वनपाल यांनी "एक पेड माँ के नाम" सविस्तर माहिती दिली.
सुलभक विनय वैरागडे यांनी खान अकादमीचे रजिस्ट्रेशन आणि इतर माहिती पीपीटीच्या माध्यमातून शिक्षकांना दिली. केंद्रीय मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख राम बुसमवार यांनी प्रशासकीय सूचना देऊन मार्गदर्शन केले. यावेळी शनिवारपेठ येथील उच्चश्रेणी मुख्याध्यापक राजेश्वर जोशी मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळेचे प्राचार्य अभिजित होशाळ, शंकर राठोड यांच्यासह केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .