'आदर्श' शिक्षकाचा 'आदर्श' दानशूरपणा ! १ लाख १० हजार मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द..

शालेयवृत्त सेवा
0





धाराशिव ( शालेय वृत्तसेवा ) : 

शिक्षकी पेशातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराची संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन डॉ. प्रवीण नीलावती किसनराव बनकर यांनी आपल्या 'आदर्श' शिक्षकाच्या सन्मानाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे.


शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मिळाल्यानंतरही, पुरस्काराच्या रकमेवर स्वतःचा अधिकार न मानता, ती समाजासाठी अर्पण करण्याचा डॉ. बनकर यांचा निर्णय घेतला. त्यांनी पुरस्कारापोटी मिळालेले एक लाख दहा हजार रुपये ही रक्कम गुरुवारी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द केली. राज्यातील गरजू व आपद्ग्रस्त लोकांसाठी हा निधी वापरला जावा, या उदात्त हेतूने त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या दानशूर कार्यामुळे 'आदर्श शिक्षक' या पदवीचा सन्मान खऱ्या अर्थाने वाढला आहे. शिक्षण क्षेत्रातील या प्रेरणादायी कृतीप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक मान्यवर उपस्थित होते.


यात प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) तुकाराम भालके, प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, शिक्षणाधिकारी (प्रा.) नागेश मापारी, शिक्षण विस्तार अधिकारी जंगम, डाएटचे अधिव्याखाता डॉ. बिराप्पा शिंदे, प्रदीप घुले, वसंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)