शाळा घरोघरी : जिल्हा परिषद राजगड शाळेचा अनोखा उपक्रम !

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती मनिषा बडगिरे यांनी भेट देऊन केले कौतूक !


नांदेड ( रुपेश मुनेश्वर ) :

किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगडगाव केंद्र मारेगाव (वरचे) या शाळेत गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये, शिक्षणाच्या प्रवाहात राहावे, वाचन लेखनाची गोडी लागावी या साठी 'घर तेथे शाळा' ( आपली शाळा घरोघरी शाळा ) या नविन उपक्रमाची सुरुवात व फलकांचे अनावरण मारेगाव बिट चे शिक्षणविस्तार अधिकारी मा. मनिषा बडगिरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.




केंद्रप्रमुख विजय मडावी यांच्या प्रमुख उपस्थिती उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील नागरिक तसेच शाळेचे मुख्याध्यापक केवलसिंग राठोड , शिक्षक नामदेव राठोड आणि विनोद राठोड उपस्थित होते.



कोरोना प्रार्दूभावामुळे शाळा बंद आहे पण शिक्षण चालू आहे हे मारेगाव ( वरचे ) बीटमधील शिक्षकांच्या विविध उपक्रमामुळे दिसून येत आहे. शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मनिषा बडगिरे यांनी अनोख्या उपक्रमाचे कौतुक करून शिक्षकांना गुणवत्ता वाढविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)