असे असते आधुनिक अवकाशयान Modern spacecraft design

शालेयवृत्त सेवा
0

 



असे असते आधुनिक अवकाशयान 

Modern spacecraft design


ISS वर जाणारे पहिले भारतीय नागरिक कॅप्टन शुभांषु शुक्ला आणि त्यांच्या टीम ला स्पेस स्टेशन वर घेऊन जाणारे हे यान आहे. 


इलॉन मस्क च्या स्पेस एक्स कंपनीने हे crew dragon यान बनवले असून सध्या सर्वात भरवशाचे मानव वाहक यान म्हणून याला मान्यता मिळाली आहे. 


फोटो मध्ये क्रमांक दिल्या प्रमाणे या यानाचे काही प्रमुख भाग आपण इथे बघुयात. 


कमांड मोड्युल (वरचा भाग) , सर्व्हिस मोड्युल (खालचा भाग) असे दोन प्रमुख भाग यात असतात. 


एकत्रित पणे मोजल्यास हे यान सुमारे 8 मीटर उंच आणि 4 मीटर रुंद (व्यास) असणारे असते. 

यातील सर्व्हिस मोड्यूल भागाच्या आत 4 जण बसू शकतात इतकी जागा असते. 


1] आर्टिक्युलेटिंग नोज कोन - articulating nosecone


यानाच्या समोर असणारा दरवाजा / आवरण door/cover असे याला म्हणू शकतो. 


आधी हा पूर्णतः यानाच्या समोर त्याचे नाक म्हणून बसवलेला असतो आणि यान अवकाशात गेल्यावर हा नोज कोन बाहेरच्या दिशेत उघडतो (जसा फोटो मध्ये दिसत आहे) 


नोज कोन च्या आत यानाचे डॉकिंग मेकॅनिझम (ISS ला जोडणी करण्याची सिस्टीम) बसवलेली  असते. 


2] ट्रंक / सर्व्हिस मोड्यूल - Trunk section / Service module


हा भाग म्हणजे यानाच्या खालच्या बाजूला असणारे एक कंपार्टमेंट सारखे असते ज्याच्या आत विविध सामान ठेवण्याची कार्गो जागा, रॉकेट इंधन टाक्या इलेक्ट्रिकल सिस्टिम्स असतात. 


3] सोलर पॅनल सिस्टीम - Solar panel array


पूर्वीच्या यानात फोल्ड होऊन नंतर उघडणारे सोलर पॅनल असायचे परंतु आधुनिक यानात थेट यानाच्या साईड बॉडी वरच फिक्स सोलर पॅनल लावलेले असतात. हे पॅनल यानाला सूर्याच्या दिशेत ठेवून विद्युत ऊर्जा बनवतात आणि कार्गो भागातील बॅटरी मध्ये स्टोअर करतात. हीच सौर विद्युत ऊर्जा यानात सर्व ठिकाणी वापरली जाते.  


जुन्या काळात असणाऱ्या यानाच्या बाबतीत अनेकदा सॅटेलाईट प्रमाणे फोल्डिंग पॅनल अर्धवट उघडले गेल्याने किंवा त्यावर अवकाशातील स्पेस जंक / मायक्रोमेटीओर आपटून पॅनल चे नुकसान झाल्याने होणारे अपघात टाळण्या साठी आधुनिक यानाच्या बॉडीवरच सोलर पॅनल बसवले गेले आहेत. 


4] खिडकी - Portholes / Windows


यानाच्या आत बसलेल्या लोकांना बाहेरचे दृश्य दिसावे म्हणून अशा प्रकारे ४ खिडक्या यानाच्या बाजूला बसवलेल्या असतात. 

आत असणारे लाईट या फोटो मध्ये दिसत आहेत. 


5] लॉन्च ऍबॉर्ट सिस्टीम - Launch abort system (emergency backup rockets)


हे सर्व यान रॉकेट स्पेस एक्स फाल्कन 9 या main rocket च्या टोकावर बसवलेले असते, 


उड्डाण करताना रॉकेट मध्ये काही मोठा बिघाड झाला हे लक्षात आले तर इमर्जन्सी एस्केप म्हणून ह्या रॉकेटच्या टोकावर बसवलेल्या यानाला मोठ्या धक्क्याने मुख्य रॉकेट पासून वेगळे केले जाते, त्यावेळी या यानाच्या कार्गो भागाच्या खाली असणारे 8 शक्तिशाली SuperDraco engines लावलेले रॉकेट मोटर चालू होऊन या यानाला फेल झालेल्या मुख्य रॉकेट पासून वेगाने दूर नेण्याचे काम करतात. नंतर पॅराशूट च्या मदतीने हा भाग अलगद जमिनीवर उतरतो आणि बॅकअप सिस्टीम मुले आतील अवकाशयात्रींचे प्राण वाचू शकतात. 


6] ऍबॉर्ट फिन्स - Abort fins (stabilizer wings)


विमान / होडीच्या सुकाणू प्रमाणे काम करणारे हे 4 लहान पंख सारखे भाग यानाच्या खालच्या बाजूला लावलेले असतात. 

इमर्जन्सी इजेक्ट वेळी ऍबॉर्ट सिस्टीम इंजिन चालू असताना यानाला स्थिरता आणि दिशा देण्याचे काम हे फिन्स (सुकाणू पंख) करतात. 


हे पंख नसतील तर यान ऍबॉर्ट होताना वेडेवाकडे भरकटत जाईल आणि क्रॅश होईल. 


7A-7B] थ्रस्टर रॉकेट - Thruster rockets pointing in various directions


16 लहान आकाराचे थ्रस्टर रॉकेट मोटर या यानाच्या सर्व बाजूने बसवलेल्या असतात ज्या अवकाशात गेल्यावर यानाचे वर-खाली, डावे-उजवे, रोल ऍंगल कंट्रोल करतात. 


सुनीता विलियम्स ज्या बोईंग कंपनीने बनवलेल्या नव्या स्टारलायनर अवकाशयानाचे मॅन्युअल परीक्षण टेस्ट करत होती त्या वेळी ह्याच प्रकारचे काही थ्रस्टर बंद पडून तिच्या यानात इमर्जन्सी निर्माण झाली होती, त्यावर सविस्तर वेगळी पोस्ट कमेंट मधील लिंक वर जाऊन वाचा. 


हे थ्रस्टर रॉकेट  गरज पडेल तेव्हाच छोट्या वेळासाठी on-off केले जातात ज्यामुळे धक्का निर्माण होऊन अवकाशात पुढे जाणाऱ्या यानाची दिशा बदल होण्यास मदत मिळते. 


काही थ्रस्टर यानाच्या समोरच्या टोकावर सुद्धा दिसत आहेत जे यानाचा पुढे जाण्याचा वेग कमी करण्यास मदत करतात किंवा अवकाशात उडणाऱ्या यानाला उलट दिशेत सुद्धा नेऊ शकतात. परफेक्ट डॉकिंग जोडणी साठी असे फाईन ऍडजेस्टमेंट करणे आवश्यक असते. 


8] डॉकिंग बर्थिंग पोर्ट मेकॅनिझम - Docking/Berthing mechanism


पृथ्वीवरून उड्डाण करून आलेल्या यानाला सुरक्षित पणे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ला जोडले जाण्या साठी जो भाग यानाच्या समोरच्या बाजूला असतो त्याला बर्थिंग / डॉकिंग पोर्ट म्हणतात. 


आधी पोस्ट मधून सांगितल्या प्रमाणे सुमारे 27000 किमी /तास वेगात उडणारे यान आणि स्पेस स्टेशन यांची रिलेटिव्ह गती जवळपास शून्य झाल्याने केवळ काही सेंटीमीटर / सेकंद वेगात यान थ्रस्टर रॉकेट चालवून फाईन ऍडजस्टमेन्ट करत शेवटी या डॉकिंग पोर्ट जोडणी द्वारे स्पेस स्टेशन ला अडकवले जाते. 


9] इंटरनॅशनल डॉकिंग सिस्टीम - International Docking System Standard IDSS (New standard adapter system)


पूर्वी केवळ रशिया आणि अमेरिका हे दोनच देश अवकाशयान घेऊन ISS वर जात होते. परंतु आता युरोपिअन स्पेस एजन्सी, जपान असे विविध देश त्यांची अवकाश याने बनवून पाठवू लागली आहेत. त्यामुळे सर्व यांना एक सामान डॉकिंग पोर्ट सिस्टीम ठेवण्याच्या उद्देशाने ही International Docking System Standard नवीन स्टॅण्डर्ड सिस्टीम ठरवली गेली आहे जी ISS वर सर्व डॉकिंग पोर्ट साईड ला बसवली गेली आहे. 


भविष्यात भारतीय गगनयान सुद्धा स्पेस स्टेशन ला जोडणी करण्या साठी अशाच प्रकारचे IDSS सिस्टीम वापरून डिझाईन केले जात आहे. 


दोन सॅटेलाईट अवकाशात जोडून काही महिन्या पूर्वी ह्या डॉकिंग सिस्टीमची सफल चाचणी इसरो तर्फे घेण्यात आली होती. 


11] ISS चा मुख्य डॉकिंग पोर्ट - Main docking side chamber on the Space station


इथे कृत्रिम हवे द्वारे प्रेशराइझ करून जोडले गेलेले यानाच्या सर्व काही सेफ्टी चेक झाल्यावर ISS च्या ह्या मुख्य पोर्ट ला असणारे दरवाजे आणि यानाच्या डॉकिंग पोर्ट ला असणारे दरवाजे उघडले जातात आणि त्यातून अवकाशयात्री यानातून ISS वर येऊ - जाऊ शकतात. 


संपूर्ण मिशन मध्ये कमांड आणि सर्व्हिस मोड्युल एकत्र जोडली गेलेली असतात. 

मिशन संपून पृथ्वीवर परत येताना, सर्व्हिस मोड्युल अवकाशात वेगळे होते आणि कमांड मोड्युल ज्याच्या खाली हिट शिल्ड बसवलेली असते ते उलटे जमिनीच्या दिशेत पडू लागते. ठरविक अंतर खाली आल्यावर वातावरणाचे घर्षण संपते आणि नंतर कमांड मोड्यूल चा वेग कमी करण्यासाठी पॅराशूट उघडली जातात. यावर सविस्तर माहिती कमेंट मधील लिंक वर जाऊन वेगळ्या पोस्ट मध्ये वाचा. 


-------------

@followers माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.


( सौजन्य : आकाशातील गमती जमती )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)