केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात १०४ नागरी प्रकल्प व ४४९ ग्रामीण प्रकल्प या प्रमाणे एकूण ५५३ बाल विकास प्रकल्प असून त्याअंतर्गत ११०६६९ एवढी अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत.
....….................................................................
🪀 आता WhatsApp वर शैक्षणिक बातम्या , जॉब अपडेट्स व महत्वपूर्ण माहिती त्यासाठी जॉईन करा 👇🏻
https://chat.whatsapp.com/GpPvphrl1AqBBmkE2lmQUF
.........................................................................
महिला व बाल विकास विभागाच्या विविध विषयांसंदर्भात दिनांक २४.८.२०२३ रोजी मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीमध्ये राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वत:ची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खोल्या रिक्त असल्यास त्या ठिकाणी स्थलांतर करण्याबाबतचे धोरण तयार करून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वत:ची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्याबाबत धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वत:ची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतर करण्याबाबतच्या धोरणास शासन मान्यता देण्यात येत आहे.
सदर धोरणाची अंमलबजावणी खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून करण्यात यावी :-
१) सदर धोरण जी अंगणवाडी केंद्रे भाड्याच्या जागेत, समाजमंदिर इ. ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकरिता लागू राहील. तथापि, भाड्याच्या जागेमधील, समाजमंदिर इ. ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रांपैकी ज्या अंगणवाडी केंद्राच्या बाबतीत स्व:मालकीची इमारत बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे, अशी अंगणवाडी केंद्रे स्व:मालकीची इमारत उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावी.
२) अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरीत करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण व जिल्हा परिषदेच्या ज्या ठिकाणच्या शाळेमध्ये अंगणवाडी स्थलांतरीत करावयाची आहे अशा ठिकाणांमधील अंतर जास्तीत जास्त १ किलोमीटर पर्यंत असावे.
३) त्यानुसार अशा शाळा इमारतीत कार्यरत वर्ग व कार्यालय यांच्या खोल्यांव्यतिरीक्त वर्गखोली रिकामी / शिल्लक असल्यास अशी वर्गखोली अंगणवाडी केंद्राकरिता उपलब्ध करून देण्यात यावी.
(४) अंगणवाडीस वर्गखोली देताना शाळेमधील स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, क्रिडांगण, क्रिडा साहित्य इ. सुविधांचा अंगणवाडी केंद्रांमधील बालकांकरिता वापर करण्याची अनुमती राहील.
५) सदर वर्गखोलीची किरकोळ दुरुस्ती तसेच अंगणवाडीच्या लाभार्थ्यांच्या दृष्टीने अंतर्गत सजावट व व्यवस्था करण्यास महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेस अनुमती राहील.
६) अंगणवाडी केंद्राचे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरण करण्याकरिता संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी व त्यांचे अधिनस्त गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समितीच्या बांधकाम शाखेचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे त्यांच्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्र व जिल्हा परिषद शाळा यांचे सर्व्हेक्षण करून जी अंगणवाडी केंद्र नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करणे शक्य आहे अशा अंगणवाडी केंद्रांच्या स्थलांतरणाबाबतचा निर्णय घ्यावा. तसेच, अंगणवाडी केंद्रांकरिता शाळेच्या इमारतीमधील वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत - वर्गखोली संरचनात्मकदृष्ट्या वापरण्यास योग्य व निर्धोक असल्याबाबतची दक्षता घ्यावी.
७) तदनंतर सदर वर्गखोली अंगणवाडी केंद्राकरिता वापरण्यास उपलब्ध करून देताना सुस्थितीत उपलब्ध करून देण्याची दक्षता संबंधित मुख्याध्यापक / केंद्रप्रमुख यांनी घ्यावी. तसेच सदर वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडी केंद्रातील बालकांचा वयोगट विचारात घेता तळमजल्यावरील वर्गखोली उपलब्ध करून देण्यात यावी.
८) अंगणवाडी केंद्र स्थलांतरीत केल्यानंतर त्या शाळेमध्ये वीजेची सुविधा उपलब्ध असल्यास अशा अंगणवाडी केंद्रांकरिता शाळेमार्फ़त वीजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
९) जी अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्याकरिता वर्गखोली उपलब्ध नाही. परंतु, त्या शाळेच्या आवारामध्ये अंगणवाडी केंद्र बांधकामाकरिता जागा उपलब्ध होत असल्यास अशा ठिकाणी अंगणवाडी केंद्र बांधकाम महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद व संबंधित बांधकाम यंत्रणा यांनी विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून करावे.
ज्या अंगणवाडी केंद्रांना स्व:मालकीची इमारत आहे. परंतु, इमारत जीर्णावस्थेत आहे व त्याकरिता नवीन अंगणवाडी बांधकाम करण्याचे प्रस्तावित नाही अशा अंगणवाडी केंद्रांचे देखील नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गखोली उपलब्ध असल्यास स्थलांतरण करता येईल. तथापि, सदर वर्गखोलीचे बांधकाम सुरक्षित
आहे याबाबत पंचायत समितीच्या बांधकाम अभियंत्यांचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच स्थलांतर करण्यात यावे.
४. सदर धोरणाची अंमलबजावणी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, गट विकास अधिकारी (पंचायत समिती), बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी समन्वयाने करावी.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .