शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांचे वेळापत्रक ठरले.. 22 मेनंतर प्रत्यक्षप्रक्रियेस सुरुवात !

शालेयवृत्त सेवा
0

 



छत्रपती संभाजीनगर ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या २०२५ २६ या शैक्षणिक वर्षासाठी होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यांचे पडघम वाजले आहेत. २२ मे नंतर प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरु होऊन बदल्यांसाठी सुधारित धोरण १८ जून २०२४ तुसार तरतुदीनुसार विशेष संवर्ग एक, पती-पत्नी एकत्रीकरण संवर्ग दोन, बदली हक्क प्राप्त अवघड क्षेत्र संवर्ग तीन, सर्वसाधारण क्षेत्र संवर्ग चार याप्रमाणे या चदल्या होतील, यासाठी शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम द्यावा लागेल. ही सर्व प्रक्रिया जून महिन्यात शाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण केली जाईल, असे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले,


उन्हाळी सुट्या लागून काही अवधी उलटल्यानंतर आणि २०२५ - २६ शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अवधी असला तरी चदल्पाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता बदली प्रक्रिया पुन्हा नव्याने चालु झाल्याने बदली पात्र व बदली हवी असलेल्या शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून भरलेल्या पसंती क्रमामधून आपल्याला कोणती मनाजोगती शाळा मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्व शिक्षकांना 66 प्रतीक्षा असणारी बदली प्रक्रिया आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी १५ जूनच्या आत होईल असे वाटते. सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळाल्यास चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते, शिक्षक समाधानी असेल तर अध्यापनाचे काम चांगल्या पद्धतीने चालते. यासाठी बदल्या होणे आवश्यक आहे.


- राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ


खोटी माहिती व शिस्तभंगाची कारवाई

मागीलवर्षी प्राथमिक शिक्षकांनी विशेष संवर्ग एक मध्ये जाण्यासाठी शक्कल लढवत दिव्यांग व घटस्फोटित प्रमाणपत्र सादर केले आणि सोयीच्या बदलीचा लाभ घेतला. मात्र यावर्षीही बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक व दोन मधील एखाद्या शिक्षकाने खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतल्याचे आढळल्यास त्याचे निलंबन, बडतर्फी करून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना आहेत.


ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचो जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाईन राबविली जाते. यास्सठी २४ एप्रिल पूर्वीच सर्व शिक्षकांना आपली वैयक्तिक, शैक्षणिक व अन्य आवश्यक माहिती ऑनलाईन भरण्यावाचत आदेशित केले होते, त्यानुसार शिक्षकांनी बदली पोर्टलवर माहिती भरली होती. प्रत्येक जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत ? किती जागा मंजूर आहेत ? सध्या शाळेत किती शिक्षक कार्यरत आहेत ? या संबधीची माहिती संबंधित


असे आहे वेळापत्रक व कालावधी :


◾संवर्ग एक बदली प्रक्रिया: कालावधी सात दिवस.


◾संवर्ग दोन बदली प्रक्रिया: कालावधी सहा दिवस.


◾संवर्ग तीन बदली प्रक्रिया: कालावधी सहा दिवस,


◾संवर्ग चार बदली प्रक्रिया: कालावधी सहा दिवस.


◾विस्थापित शिक्षक प्रक्रिया राऊंड: कालावधी सहा दिवस.


अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे. (गरज भासल्यास)विभागाकडे उपलब्ध झाली आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हांतर्गत बदली संदर्भात खालील प्रमाणे प्रक्रिया राबविली जाऊ शकते.


▪️बदलीपात्र शिक्षकांच्या राहिलेल्या काही जिल्ह्यांच्या याद्या एक, दोन दिवसांत तयार होतील,


▪️वेळापत्रक विन्सिस पोर्टल वर प्रसिद्ध होणार असून त्यानुसार बदली प्रक्रिया विहित वेळेत पार पडेल.


▪️ग्राम विकास विभागाकडून बदली वेळापत्रक विन्सिसला प्राप्त होईल.


▪️वेळापत्रक प्राप्त होताच ते विन्सिस च्या माध्यमातून प्रसिद्ध केले जाईल व सर्व शिक्षकांपर्यंत पाठविले जाईल.


▪️बदली वेळापत्रक निर्गमित होतात संवर्ग एक, दोन बाबत होकार । नकार आणि पडताळणीची कार्यवाही सुरु होईल.


रिक्त पदे माहिती भरणे: 

१९ ते २२ मे २०२५ या कालावधीत गटशिक्षणाधिकारी लॉगिन वर रिक्त पदांची माहिती भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. २२ मे नंतर बदलीबाबतची पुढील प्रक्रिया तत्काळ सुरू होईल. १० जून पूर्वी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


आंतरजिल्हा बदली प्रक्रियाः 

शिक्षकांचे रोस्टर पडताळणीच्या सूचना सर्व जिल्हा परिषद प्रशासनाला ग्रामविकास विभाग स्तरावरून दिल्या असुन जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेनंतर लगेच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. याचाचतची अधिकृत माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)