जिल्हा परिषदेच्या खुल्या प्रवर्गातील सर्व मुलांना गणवेश मिळावे यासाठी पंचायत राज समितीचे प्रमुख यांना निवेदन सादर..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सर्व मुलींना  व अनुसूचित जाती, जमाती,इतर मागास वर्ग, दारिद्र्य रेषेखालील मुलांना मोफत गणवेश दिले जातात.परंतु खुल्या प्रवर्गातील मुलांना गणवेश मिळत नाहीत त्यामुळे मुलांमध्ये जणू विषमता निर्माण होत आहे.


विद्यार्थी हा विद्यार्थी असतो त्यांना बालवयात जातीत विभागाने ही बाब  पुरोगामी असणाऱ्या  महाराष्ट्रस शोभणारी नाही.ही बाब  शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र च्या एका शिष्टमंडळाने नांदेड येथे दौऱ्यावर आले  असता पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ श्री संजय रायमूलकर यांना एका निवेदनाद्वारे केली असून त्यांनी सुद्धा या बाबतीत विशेष लक्ष देऊन आगामी काळात जिल्हा परिषदेच्या सर्व मुलांना गणवेश मिळतील असे धोरण निश्चित करण्यात येईल असे सांगितले.


यावेळी शिष्टमंडळात राज्य संघटक रवी ढगे, शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष संतोष अंबुलगेकर, गंगाधर कदम, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे संजीव मानकरी  उपस्थित यावेळी नांदेड उत्तर आ श्री बालाजी कल्याणकर ,युवा सेना जिल्हा प्रमुख माधव पावडे, आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)