प्रदूषण टाळण्यासाठी कला शिक्षक अरविंद कोळी यांचा अनोखा उपक्रम !
नांदेड :
कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या पेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले अरविंद अधिकराव कोळी यांनी स्वतः गणेश मूर्ती चे फलकावर सलग चार तास रंगीत खडूने रेखाटन करत चित्रगणपती साकारला आहे व त्या फलक चित्रगणेशाची स्थापना आपल्या घरी केली आहे.
ही संकल्पना त्यांना त्यांचे मुख्याध्यापक जे. पी.पाटील यांनी सुचविली. फलक चित्रात श्री गणेशाने हातात कोरोना प्रतिबंध व नाशासाठी त्रिसूत्री शस्त्र घेतले असून त्याने कोरोनाचा नाश करतोय असा चित्र प्रसंग रेखाटला आहे. या गणेश फलक चित्ररेखाटनातून निश्चितच पर्यावरणाला घातक असणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीचा वापर आपण टाळू शकतो व पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. तसेच आपण या चित्र गणेशाचे चित्रण करत वेगवेगळे संदेश जनमानसांपर्यंत पोहचवू शकतो. सध्या ग्रामीण व शहरी भागामध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढू पाहत आहे. परंतु सर्वांनी कोरोना विषयक शासकीय नियमांची अमंलबजावणी करावी. तसेच लसीकरण झाले नसेल तर लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे व सुरक्षित अंतर ,मास्कचा वापर, सतत हात धुणे या त्रिसुत्री चे आचरण करावे. तसेच प्रदूषण टाळून पर्यावरण वाचवावे. हा सामाजिक संदेश सरांचा चित्र गणेश देत आहे.
अशा पद्धतीने थोडी संकल्पना वेगळी आहे परंतु आपण कागदावर, कपड्यावर, फलकावर गणेश चित्र निर्मिती करून चित्र गणेशाची स्थापना करून पर्यावरणपूरक चित्र गणेशा स्थापन करू शकतो अशी माहिती अरविंद कोळी दिली. तसेच शाळेत अरविंद कोळी यांनी आजपर्यंत एकूण 400 पर्यंत सामाजिक संदेश देणारे व चित्रमय दिनविशेषचे महत्व सांगणारे फलक रेखाटले आहेत.
❤🙇♂️🙏
उत्तर द्याहटवा