वार्तापत्र ( अस्मा नराफ ) :
शाळा बंद काळात विद्यार्थी गुणवत्ता मंच संपुर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरक म्हणून काम करत आहे विद्यार्थी गुणवत्ता मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणार्या ४० जिल्हा संयोजक व संयोजिंकाना डॉ.गोविंदजी नांदेडे साहेब माजी प्राथमिक शिक्षक संचालक विद्या प्राधिणिकरण पुणे व डाॅ प्रताप मुदलियार सर लाॅयन्स क्लब जिल्हाअध्यक्ष नवी मुंबई यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला सोबतच विद्यार्थी मंचाच्या ज्ञानदर्पण मासिकाचा दुसरा अंक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. तसेच बीड नांदेड व राज्यस्तरावर घेण्यात येणार्या विविध स्पर्धेचा निकाल मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत घोषित करण्यात आला.
पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट ग्रुप म्हणून यवतमाळ पालघर व नवीमुंबई ग्रुपचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट ग्रुप म्हणून सांगली ठाणे नागपूर बीड नांदेड कोल्हापूर या ग्रुपचा सन्मान करण्यात आला तर पुणे रत्नागिरी धुळे गोंदिया अमरावती मंचाचा शिक्षण गौरव म्हणून सन्मान करण्यात आला सर्वोत्कृष्ट उपक्रम सम्राज्ञी म्हणून वंदना कोषटवार चित्रा गोतमारे यवतमाळ सुरेखा गुळवे अल्का फुलझेले पालघर संगिता ठुबे ठाणे सुमन सायमोते नवी मुंबई राजश्री नलावडे माधुरी शेलोकार उज्वला उके नागपूर पूनम ननावरे पुणे करणा मोहीते सांगली निलेश इंगोले अमरावती तर उत्कृष्ट उपक्रम सम्राज्ञी सम्राट पुरस्कारामध्ये रश्मी राजपूरकर पालघर वर्षा कटकमवार यवतमाळ आसमा नदाफ सांगली सुवर्णा शिंगोटे अश्विनी चौधरी पुणे शंकुतला सुतार कोल्हापूर शंकर चौरे धुळे सविता कदम शोभा नलाबले प्रमिला सेनकुडे नांदेड योगिता पाटील रत्नागिरी सविता ढाकणे बीड मिनल पुरी यवतमाळ शिक्षण गौरव पुरस्कारामध्ये योगिता भूमर वैशाली वैराळे अमरावती मंगला बोपचे भंडारा संगिता चौधरी जयश्री सिरसाटे गोंदिया मनिषा बंड रूपाली खाडे पुणे नवनाथ बोराडे सिंधुदुर्ग स्नेहा माळी दुलाजी कौंदुलकरसर रेखा गायकवाड रेश्मा पटवेगार कोल्हापूर तृषाली कदम रत्नागिरी नसीम कुरणे नवी मुंबई शैला जोशी परभणी यांना पुरस्कार आॅनलाईन डाॅ गोविंदजी नांदेडे साहेब व डाॅ प्रताप मुदलियार साहेब नवी मुंबई यांच्या हस्ते आॅनलाईन प्रदान करण्यात आला .
विद्यार्थी मंचाच्या आपण तन मन धनाने पाठीशी राहू असा मनोदय मुदलियार सरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला तर विद्यार्थी मंचाची चळवळ संपूर्ण राज्यातील २ कोटी विद्यार्थ्यापर्यत पोहचविण्यासाठी आपण सदैव विद्यार्थी मंचाच्या टिमच्या पाठीशी आहे असे मनोगत अध्यक्षीय भाषणातून डाॅ नांदेडे साहेबांनी व्यक्त केले.
विद्यार्थी मंचाच्या कार्याविषयी विद्यार्थी लवित पाटील अनुष्का बदुकले आरोही जामगे ज्ञानदा या विद्यार्थ्यानी आपल्या प्रतिक्रिया दिल्या तर शिक्षकामध्ये वंदना कोषटवार सुमन सायमोते प्रमिला सेनकुडे संगिता ठुबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहुण्यांचा परिचय निलेश इंगोले अमरावती विभाग प्रमुख व शितल दुधे यांनी करून दिला.
विविध स्पर्धेचे निकाल देवराव चव्हाण सर सविता कदम राजश्री नलावडे यांनी जाहीर केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरस्काराची घोषणा राज्यप्रमुख विकास गुणवत्ता मंच महादेव निमकर यांनी केली कार्यक्रमाचे रंगतदार संचलन विद्यार्थी गुणवत्ता मंचाच्या राज्यसंयोजिका शितल दुधे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजश्री नलावडे जिल्हा संयोजिका बीड यांनी केले या कार्यक्रमासाठी राज्यातील शिक्षक पालक व विद्यार्थी हजर होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यप्रमुख महादेव निमकर देवराव चव्हाण व राज्यसंयोजिका शितल दुधे यांनी अथक परिश्रम घेतले .


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .