२४ वर्ष सेवा झालेल्या शिक्षकाना निवडश्रेणी व सर्व विषय शिक्षकाना वेतनश्रेणी लागु करा.. शिक्षक संघटनेची मागणी

शालेयवृत्त सेवा
0

 




महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी  व शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन !


नांदेड (महेश पाटील ) :

 जिल्हयामधे मागील अनेक वर्षापासुन प्रलंबीत असणारा निवडश्रेणीचा प्रश्न व विषय शिक्षकाना पदवीधरची वेतनश्रेणी लागु करण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा यासाठी म.रा.शिक्षक परीषदेच्या शिष्टमंडळाने राज्यकार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली मुकाअ सौ.वर्षा ठाकुर मॅम व शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर साहेब याना निवेदन देवुन आग्रही मागणी केली.


नांदेड जिल्हा परीषदेमधे सन 2013 पासुन म्हणजे 8 वर्षापासुन 24 वर्ष सेवा झालेल्या पाञ शिक्षकाना निवडश्रेणीचा लाभ देण्यात आला नाही.अनेक शिक्षक पाञ असुन ते सेवानिवृत झाले आहेत तरीही त्याना निवडश्रेणीचा लाभ दिलेला नाही.त्यामुळे 2013 पासुन दरवर्षी 20 टक्के प्रमाणे सर्व पाञ शिक्षकाना निवडश्रेणी लागु करण्याचे आदेश निर्गमीत करावेत.तसेच विषय शिक्षकाना इतर जिल्हयाप्रमाणे पदवीधरची वेतनश्रेणी लागु करण्यात यावी.असी आग्रही मागणी शिक्षक परीषदेच्या शिष्टमंडळाने मा.मुकाअ सौ.वर्षा ठाकुर व शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर याना भेटुन केली.


शिष्टमंडळामधे विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे,जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे,विभागीय प्रतिनीधी श्याम रायेवार,कोषाध्यक्ष बालाजी पांपटवार,बी.जी.बुकटे,स्वामी सर,माध्यमीक शिक्षक संघटनेचे दिगंबर मांजरमकर,एम ए खदीर,सुनिल दाचावार इ.उपस्थीत होते. असी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद,नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुखम महेश पाटील यांनी सांगितले.

          

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)