सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.. नॅशनल मेडिकल कौन्सिलची मान्यता..

शालेयवृत्त सेवा
0

 



मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे एका वर्षात3 आश्वासन पूर्ती !

 

 मुंबई, दि. 21 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिल्याप्रमाणे २५ वर्षानंतर प्रथमच एका वर्षाच्या आत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नॅशनल मेडिकल कौन्सिलने यास १७ तारखेला मान्यता दिली असून यावर्षी एमबीबीएसच्या १०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

            

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे महाविद्यालय सुरू होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. याबद्दल खासदार विनायक राऊत, राहुल शेवाळे, आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू, श्री.अरूण दुधवडकर यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.   

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)