देश विदेशातील नामवंत अशा आठ चित्रकारांच्या कलाकृतीत चित्रकार रणजित वर्मा यांचे मुंबई येथे चित्रप्रदर्शन....!!!

शालेयवृत्त सेवा
0

 


प्रदर्शनातील चित्र विक्री ची रक्कम ब्रेस्ट कॅन्सर पिडीतांना दिली जाणार !

    

नांदेड ( मिलिंद जाधव ) :

माहूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार तथा उपक्रमशील शिक्षक रणजित दत्त वर्मा यांचे नेहरू आर्ट सेंटर,मुंबई येथे "8 आर्टिस्ट" या नावाचे चित्रप्रदर्शन दि.21सप्टेंबर ते दि. 27 सप्टेंबर 2021 दरम्यान होत असून यात देश विदेशातील नामवंत अशा आठ चित्रकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येत आहेत.या प्रदर्शनात रणजित वर्मा (नांदेड), भानू गोवाती(बंगळूर),प्रकाश जाधव (मुंबई),गोपाल ढवळे (नागपूर),मनिषराव(दिल्ली),स्वाती द्रविड(इंदौर), मोना राठोड(ओमान), शिल्पा राठोड(मुंबई) या जगप्रसिद्ध आठ चित्रकारांच्या कलाकृतींचा सहभाग आहे. 

                   

या चित्रप्रदर्शनासाठी 'नेशनल ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशन'च्या संचालिका 'किरण बेदी' व डाॅ.दिपांकर राॅय  (द ग्लोबल कन्व्हेनर ॲन्ड चेअरमन  इंटरनॅशनल आर्ट एक्ट्स) यांनी प्रोत्साहन देऊन या प्रदर्शनाची संपूर्ण जबाबदारी स्विकारत शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच या प्रदर्शनातील चित्र विक्री ची रक्कम ब्रेस्ट कॅन्सर पिडीतांना दिली जाणार हा उदात्त हेतू ठेवण्यात आला आहे असे प्रतिपादन चित्रकार रणजित दत्त वर्मा यांनी प्रतिनिधींशी बोलताना केले.

                

चित्रकार रणजित दत्त वर्मा यांनी 2018 मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या लोकांसाठी कोल्हापूर पुरग्रस्थांसाठी मदतीसाठी च्या चित्रप्रदर्शनात आपली कलाकृती देऊन पुरग्रस्थांसाठी मदत पुरवली होती.सामाजिक जाणिव जपणाऱ्या रणजित वर्मा यांची यापूर्वी ही देश आणि विदेशात अनेक चित्रप्रदर्शने झाली आहेत.त्यांना अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

                    

माहूर सारख्या दुर्गम भागातून त्यांचा कलाप्रवास थक्क करणारा असून त्यांच्या या यशाचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी युवराज म्हैत्रे,अ.भा.पत्रकार संघ माहूर तालुकाध्यक्ष सर्फराज दोसानी,शिक्षक जितेंद्र वर्मा, जेष्ठ पत्रकार नंदु संतान, पुरोगामी शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील, कवी मिलिंद कंधारे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर, स्तंभलेखक उत्तम कानिंदे, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रिडा मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे,  जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव, डॉ.सुरज सुर्यवंशी, बालाजी उबाळे, जितेंद्र माकोडे,दिलीप दारव्हेकर, चंद्रकांत पोतदार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)