सांगली ( विद्या चौगुले ) :
येथील सरोवर शिक्षण मंडळ साऊथ संचलित जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला व डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम ज्युनिअर कॉलेज मध्ये" महात्मा गांधी जयंती व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती " उत्साहात साजरी करण्यात आली.या शुभदिनाचे औचित्य साधून शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील व सहकारमहर्षी विष्णू आण्णा पाटील यांचीही जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी संस्थापक मा. हाजी मुनीरुद्दीन मुल्ला सर, अध्यक्ष मा. फारुख अकिवाटे सर,मा. एस. एम. मुल्ला सर मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या निमित्ताने संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त विदयार्थिनी पूजा माळी, अतिया विजापुरे व सानिया विजापुरे यांनी भाषणे सादर केली." थोर नेत्यांच्या कार्याचा वारसा आपल्या कर्तृत्वाने पुढे चालविणे हीच खरी आदरांजली ठरेल" असे मत अध्यक्षीय भाषणात मा. फारुख अकिवाटे सरांनी व्यक्त केले. थोर नेत्यांच्या जीवन -कार्यावर मा. संस्थापकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.मुख्याध्यापक श्री.एस. ए.कुरणे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील तर सौ. प्रमिला कांबळे यांनी लालबहाद्दूर शास्त्री यांच्याबद्दल माहिती दिली.
रांगोळी ,निबंध आणि पोस्टर स्पर्धेतील क्रमांकप्राप्त विदयार्थी माया रसाळ,सानिया पटेल,मिसबा जमादार, अकसा शेख,हुजेफा शेख,साद बागवान,निदा सय्यद, सफा बागवान स्वालिया बारगीर, सफिया मुजावर, अमीन मुलाणी, रुकैया सय्यद यांना ,शिक्षकांच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल च्या मुख्याध्यापिका मा. शहेनाज नदाफ, मा.नसिम पिरजादे ,श्री.नीलेश माळी व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मा.श्री.पटेल उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत श्री. बी. पी. पाटील व आभार श्री. एम एस. मुल्ला यांनी व्यक्त केले.कार्यक्रम नियोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सौ. विद्या चौगुले व परीक्षक म्हणून सौ.उषा जाधव, प्राचार्य श्री.प्रकाश माळी यांनी काम पहिले.श्री. रामदास हिंगसे व सर्व शिक्षकांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले.संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यन्त उत्साहात संपन्न झाला.




आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .