दत्तबर्डी संस्थान, हदगावच्या वतीने जि.प.प्रा. गोजेगाव शाळेला एक एकर जमिनीचे दान..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी मा.डॉ.विपीन इटनकर साहेब यांच्या निजि कक्षात दत्तबर्डी संस्थान हदगाव व जिल्हा महसूल व जिल्हा परिषद प्रशासन यांच्यात पार पडलेल्या तिसऱ्या व अंतिम सुनावणी दरम्यान जि.प.प्रा.शाळा गोजेगाव केंद्र भानेगाव ता.हदगाव शाळेची जूनी इमारत महामार्ग निर्मितीत अधिग्रहीत केली गेल्यामुळे व गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा बांधण्यासाठी दत्तबर्डी संस्थानच्या वतीने जि.प.प्रा.शाळा गोजेगाव केंद्र भानेगाव ता.हदगाव शाळेला एक एकर जमिन दान करण्याचा सामंजस्य करार झाला.

    

यावेळी दत्तबर्डी संस्थान,हदगावचे विश्वस्त गोपाळगिरी महाराज यांचे प्रतिनिधी व संस्थानचे कोषाध्यक्ष मा.लक्ष्मणराव देशमुख, विश्वस्त सदस्य मा.विठ्ठलराव पाटील हडसणीकर, चर्चे दरम्यान फोनवरून हदगावचे आ.मा.माधवराव पाटील,जवळगावकर उपस्थित होते.


प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी मा.डॉ.विपिन इटणकर साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सौ.वर्षा ठाकूर मॅडम, उपशिक्षणाधिकारी (प्रा.) मा.डॉ. दत्तात्रय मठपती, गटशिक्षणाधिकारी मा.किशनराव फोले, गोजेगावचे सरपंच रवी गोरे, उपसरपंच मा.कैलास ढगे, प्रस्तुत शाळेचे मुख्याध्यापक मा.नामदेव पतंगे, भानेगाव केंद्राचे माजी मुख्याध्यापक तथा संघटना प्रतिनिधी मा.बालासाहेब लोणे, मा.चंद्रकांत मेकाले, मा.चंद्रकांत कुणके उपस्थित होते.


अराजपत्रित मुख्याध्यापक मा.बबनराव घोडगे यांनी उपस्थित राहून सहकार्य, विश्वस्तांचा व जमिनदान मिळविण्याच्या प्रक्रीयेत जि.प.प्रा.शाळा गोजेगाव शाळेचे मुख्याध्यापक मा.नामदेव पतंगे व हदगाव पंसचे गटशिक्षणाधिकारी मा.किशनराव फोले यांनी विशेष प्रयत्न केले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)