नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
निपुण भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे” आयोजन दिनांक २० डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत भोकरच्या जि.प. कन्या शाळेत झाले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पूणेमार्फत दिलेल्या सुचने नुसार व भोकर चे गटशिक्षणाधिकारी मा.डॉ. डी एस. मठपती साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री मिलिंद जाधव यांनी थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या विविध कार्याबद्धल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रश्न मंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गणिती परिपाठातून प्रश्नोत्तरे, कोडी, गणिती गिते यांचे सादरीकरण करून गणित विषयाबद्धल आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या गेला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर सुरंगलीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विज्ञान शिक्षक मिलिंद जाधव , कांचन जोशी, नरसिंग पसनुरवार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले असून विलास गायकवाड , रमेश खांडरे, मोहीनी बाचेवाड यांनी मेहनत घेतली. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेत अली शेख, साई डूबे, संतोष नक्कलवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर गणिती प्रदर्शनात निकिता इबिते, श्रावणी बोलजवार, अनुष्का मादसवाड, कांचन देशमुख, श्रध्दा कदम, खंडागळे, हरीओम डूबे, मोहन डूबे, पुंडलिक बोईनवाड आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापका मार्फत कौतूक करण्यात आले.

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .